एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

साऊथ मधील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाला हवा आहे असा नवरा, नाहीत तर लग्नच करणार नाही..स्वतः केला खु’लासा..

कोणतीही व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली तरी तिच्या काही मूलभूत अपेक्षा असतातच. आणि त्या अगदी सामान्य माणसांसारख्याच असतात. राहायला छान घर असावं, मनासारखा जोडीदार असावा या त्यातल्या काही अपेक्षा.

व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातली असू दे, तिच्या या अपेक्षा असतातच आणि त्यात काहीच गैर नाहीये. अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा सांगितल्या.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतलं एक गाजलेलं नाव म्हणजे तमन्ना भाटिया. तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तमन्ना मुख्यत्वे तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करते. तिने अनेक कन्नड चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे.

तमन्ना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. २००५ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी तिने ‘चाँद सा रोशन चेहरा’ या हिंदी चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

इतर अनेक अभिनेत्रींप्रमाणे तमन्ना च्या लग्नाची चर्चा देखील तिच्या चाहत्यांमध्ये सुरू असते. या गुणी अभिनेत्रीला नक्की कोणत्या प्रकारचा जोडीदार हवा आहे याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तिच्या अफेयरच्या बातम्या अजून तरी कानावर आल्या नसल्या तरी तिच्या स्वप्नातला राजकुमार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते धडपडत आहेत. तमन्नाने नुकताच तिच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षांबद्दल खुला’सा केला.

इतर अनेक मुलींप्रमाणे आपला जोडीदार समजूतदार असावा, प्रेमळ असावा या अपेक्षा तर आहेतच. पण तमन्नाला एक व्यक्ती तिचा जोडीदार होण्यासाठी अत्यंत योग्य वाटते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून तो आहे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला सुप्रसिद्ध अभिनेता महेश बाबू. तमन्ना आणि महेश बाबू यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. विशेष म्हणजे महेश बाबू विवाहीत आहे.

टॉलिवूड चा सुपरस्टार महेश बाबूचे अभिनेत्री नम्रता शिरोडकर बरोबर लग्न झाले आहे. हे सगळे माहीत असूनही तमन्नाला महेश बाबू योग्य जोडीदार का वाटतो? अर्थात हा सगळा विनोदाचा भाग असल्याचा खुला’सा नंतर तमन्नाने केला. पण यामुळे तमन्नाला कसा जोडीदार हवा आहे, याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

कधी ना कधी तरी तमन्नाला तिच्या मनासारखा जोडीदार मिळेलच, पण तोपर्यंत तिच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षांबद्दल तिचे चाहते अनेक अंदाज लावत राहतीलच. तमन्नाला कसा मुलगा जोडीदार म्हणून हवा आहे, याचा खुला’सा तिने लवकरात लवकर करावा म्हणून चाहते वाट पहात आहेत. तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी आमच्या टीम कडून तमन्नाला हार्दिक शुभेच्छा!

You might also like