एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सारेगमपच्या नवीन पर्वातील चिमुकली स्वरा जोशी हीची आईसुद्धा आहे एक प्रसिद्ध गायिका..पहा

झी मराठी वाहिनी ही नेहमीच नवनवीन मालिका घेऊन येते आणि आपल्या चाहत्यांना खूश करत असते. पण झी ने बारा वर्षांपूर्वी केलेल्या सारेगमप लिटिल चँम्स या रिअ‍ॅलिटी शो ला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. यात कार्तिकी गायकवाड हीने गायलेल्या “घागर घेऊन” या गवळणीने ने अख्ख्या महाराष्ट्राला ठेका धरायला लावला होता.

याच पर्वातील पाच फायनलिस्टना झी ने जजेसच्या रुपात सारेगमपच्या नव्या पर्वात प्रेक्षकांसमोर आणलं आहे. हे पाच जजेस म्हणजेच २००९ सालच्या सारेगमपमधले आर्या, कार्तिकी, मुग्धा, प्रथमेश आणि रोहित हे फायनलिस्ट आहेत. या सगळ्यांना परत एकदा आगळ्या वेगळ्या रुपात बघून चाहत्यांना खूप आनंद होतोय.

सारेगमपचे नवीन पर्व अनेक कारणांनी गाजत आहे. विशेष म्हणजे या पर्वाचे सुत्रसंचलन सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही करत आहे. या पर्वातील एक चिमुकली स्वरा जोशी हीने मागच्या आठवड्यात गायलेलं ही पोली साजूक तुपातली हे गाणं सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

अनेकांना तिचा नखरा आवडत आहे. लहान मुलं जेंव्हा गातात तेंव्हा त्यांच्या गाण्यात असणारा निरागसपणा खूप भावून जातो. या निरागसपणासाठी आणि आपल्या बालपणाचं प्रतिबिंब पाहण्यासाठी अनेक जण हा प्रोग्राम आवर्जून पाहतात.

Third party image reference

स्वरा जोशी ही सध्या तिसऱ्या इयत्तेत शिकत आहे. तिच्या शाळेचे नाव साने गुरुजी इंग्लिश मेडियम असून तिची शाळा मुंबईमधील दादर इथे स्थित आहे. शालेय अभ्यासाबरोबरच स्वरा ही गायनाचेदेखिल धडे घेत आहे. तिची प्रगती आपल्याला दिसूनच येत आहे. या स्पर्धेत तिला अनेक अनुभव येतील आणि तिला खूप काही शिकायला मिळेल यात तीळमात्रही शंका नाही.

ती या स्पर्धेत पुढे कुठली गाणी गाणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे स्वरा जोशी हीची आईसुद्धा खूप सुप्रसिद्ध गायिका आहे. तिच्या आईचे नाव केतकी भावे-जोशी असे आहे. तर वडीलांचे नाव अभिजीत जोशी असे आहे. अभिजित जोशी हेसुद्धा संगीत क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. घरूनच संगीताचा असा देदीप्यमान वारसा लाभल्यानंतर अशीच गायिका बाहेर पडणार हे साहजिक आहे.

Third party image reference

केतकी भावे यांनी अनेक गाणी गायली आहेत. “मम्मी की लोरीया” या अल्बममधले सो जा बेटा हे त्यांनी गायलेले गाणे प्रचंड सुरपहिट ठरले. अनेकांना केतकी भावे यांचा आवाज भावतो. त्यांच्या आवाजात एक साधेपणा आणि अलौकिक माधुर्य आहे. जय जय महाराष्ट्र माझा या कार्यक्रमातही त्या गाताना दिसून आल्या होत्या. पण आता त्यांची मुलगीसुद्धा त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवते आहे.

रिअ‍ॅलिटी शोजमधे गायची स्वरा जोशी हीची ही पहिली वेळ मुळीच नाही. याआधीसुद्धा सोनी मराठी वाहिनीवरील “जय जय महाराष्ट्र माझा” या कार्यक्रमात तिने बालगायिका म्हणून सादरीकरण केले होते. तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

You might also like