एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

स्वप्नील जोशीच्या बायकोला पाहिले आहे का? सिनेइंडस्ट्रीच्या झगमगाटापासून असते दूर..

मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजेच स्वप्नील जोशी. बालकलाकार म्हणून इंडस्ट्री मध्ये पदार्पण केलेला हा मुलगा पुढे जाऊन मराठी चित्रपटसृष्टीचा रोमँटिक हिरो म्हणून प्रसिद्धीस आला. नंतर स्वप्नीलने अनेक प्रकारच्या भूमिका करत आपण फक्त चॉकलेट हिरो नसल्याचे सिद्ध केले. मराठीमधील आघाडीच्या कलाकारांमध्ये स्वप्नीलचे नाव घेतले जाते.

स्वप्नीलने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या त्याच्या ‘समांतर २’ या वेब सिरीजमुळे तो चर्चेत आहे. त्याने या वेब सिरीज मध्ये निभावल्या भूमिकेमुळे सर्वांनी त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक केले आहे.

सोशल मीडिया वरही स्वप्नील बराच सक्रीय असून आपल्या प्रोजेक्ट्स बद्दल तो नेहमी आपल्या चाहत्यांबरोबर त्याचे अपडेट्स शेअर करत असतो. त्याने बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबाचेही फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत.

स्वप्नील जोशी हे जरी चित्रपटसृष्टीतलं गाजलेलं नाव असलं, तरी त्याची पत्नी मात्र या सगळ्या झगमटापासून दूर असते. स्वप्नीलच्या पत्नीचे नाव लीना आहे. लीना डेंटीस्ट आहे. स्वप्नील जोशी आणि लीना आराध्ये यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांचे हे अरेंज मॅरेज आहे. लीना ही स्वप्नीलची दुसरी बायको आहे. जरी हे लग्न अरेंज मॅरेज असले तरी लग्न ठरण्यापासून लग्न होईपर्यंतचा त्यांचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेत शोभेल असा आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

अकरावीत असताना त्याची पहिली पत्नी अपर्णा आणि त्याचे सूत जुळले. त्यांनी पुढे लग्नही केले. मात्र काही कारणामुळे ते एकत्र राहू शकले नाहीत आणि विभक्त झाले. लग्नानंतर चार वर्षांनी म्हणजे २००९ मध्ये दोघांनी घट’स्फो’ट घेतला.

स्वप्नील आणि लीनाच्या भेटीची कहाणी फार मनोरंजक आहे. मुलगी बघण्याचा कार्यक्रम मुंबईतील एका कॉफी शॉप मध्ये ठरला होता. त्यादिवशी स्वप्नीलचे शूटींग होते. शूट रात्री उशिरा म्हणजे जवळपास साडेअकराच्या दरम्यान संपले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

शूटींग संपवून स्वप्नील इतक्या उशिरा लीनाला भेटायला कॉफी शॉप मध्ये गेला. इतक्या उशिरासुद्धा लीना त्याची वाट बघत बसली होती. एक मुलगी आपली वाट बघत इतक्या उशिरापर्यंत थांबली, या गोष्टीने स्वप्नीलला प्रभावित केले. हीच गोष्ट त्यांच्या सुखी संसाराची नांदी ठरली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

पहिल्या भेटीतच त्यांचे सूर जुळले. मने जुळली आणि २०११ मध्ये दोघांचे लग्न झाले. आता या दोघांना दोन मुलेदेखील आहेत. त्यांच्या मुलीचे नाव मायरा तर मुलाचे नाव राघव आहे. काय मग मंडळी, कशी वाटली स्वप्नील-लीनाची ही स्टोरी?

You might also like