एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

खूपच ग्लॅमरस आहे अभिनेता सुयश टिळक ची होणारी बायको! खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर..पहा

सध्या सोशल मीडिया वर मराठी अभिनेता सुयश टिळक याच्या साखरपुड्याची बातमी जोरदार व्हायरल होत आहे. सध्या कलर्स मराठी वरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत सुयश ‘शंतनू’ ची भूमिका करत आहे. नुकताच साखरपुडा झाला असल्याने लवकरच सुयश च्या ‘शुभमंगल’ ची बातमीही कळेल अशी आशा प्रेक्षकांना वाटू लागली आहे.

पण सुयश च्या आयुष्यात हे ‘मंगल’ क्षण घेऊन येणारी मुलगी कोण आहे? तिचं नाव आहे आयुषी भावे. सुयश टिळकने नुकतेच आपले साखरपुड्याचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by A a y u s h i (@aayushibhave)

इंस्टाग्राम वर त्याने आपले हे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रेटींनी सुयश आणि आयुषी यांचे त्यांच्या साखरपुड्याबद्दल अभिनंदन केले आहे.

खरं तर सुयश ने जून महिन्याच्या सुरुवातीलाच आपला साखरपुडा उरकला होता. आयुषीच्या वाढदिवसादिवशी त्याने ही खास बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली. आयुषी भावे ही देखील एक अभिनेत्री आहे. त्याचबरोबर ती एक डान्सर आणि मॉडेल देखील आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by A a y u s h i (@aayushibhave)

‘युवा डान्सिंग क्वीन’ या टीव्ही वरील कार्यक्रमात ती झळकली होती. तिचा एक नवीन चित्रपटही येतो आहे. सध्या तिचा यूट्यूब वरील ‘या गावाचं की त्या गावाचं’ हा लावणी व्हिडिओ देखील खूप व्हायरल होतो आहे.

आयुषी खूपच ग्लॅमरस दिसते. तिच्या सोशल मीडिया वरील फोटो वरून हे सहज कळून येते. सध्या सुयश आणि आयुषीच्या साखरपुड्याच्या गोड बातमीने चाहते खूपच खूष आहेत. आता या दोघांचे ‘शुभमंगल’ कधी होते याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by A a y u s h i (@aayushibhave)

खरं तर प्रेक्षकांना सेलिब्रेटीज् च्या अफेयर्स बद्दल खूप उत्सुकता असते. सेलिब्रेटीज् च्या लव्ह लाईफ बद्दल बऱ्याच चर्चा देखील होत असतात. अशा चर्चांमधूनच अनेक अफवा देखील पसरतात. पण सुयश च्या साखरपुड्याची बातमी अचानकच कळल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सेलिब्रेटीज् च्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्या सामान्य माणसाला माहीत नसतात. अशा बातम्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचे काम आम्ही करत असतो. त्यामुळे अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नेहमी व्हिजिट करत राहा. तसेच कमेंट्स द्वारे तुमचे मत ही आम्हाला कळवत राहा. या बातम्या दुसऱ्यांना देखील कळाव्या यासाठी आमचे लेख आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करत राहा.

You might also like