एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सूर्यवंशी’ चित्रपटातील सलमाची हि अभिनेत्री आता २९ वर्षांनी दिसते अजून खूपच सुंदर आणि हॉ ट..पहा

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानचा राधे चित्रपट रिलीज होऊन फक्त काही दिवस झाले आहेत आणि चित्रपटाने अनेक रे’कॉर्ड तोडले आहेत. हा चित्रपट सध्या लॉक डाउन मुळे OOT प्लॅटफॉर्म वरती रिलीज करण्यात आला आहे. अभिनेता सलमान खान गेल्या ३२ वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये काम करत आहे. सलमान खानच्या फिल्मी करियरची सुरूवात १९८९ साली आलेल्या मैने प्यार किया या चित्रपटापासून झाली. त्यानंतर सलमान खान मुख्य अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत काम करत आहे.

सलमान खानने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. त्याच्यासोबत दिसणार्‍या बर्‍याच अभिनेत्री आता चर्चेत नाहीत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे शीबा आकाशदीप.

शीबा आकाशदीपने सलमान खानसोबत ‘सूर्यवंशी’ चित्रपटात काम केले होते. राकेश कुमार दिग्दर्शित हा चित्रपट ७ फेब्रुवारी १९९२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शीबाने सलमानच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

‘सूर्यवंशी’ चित्रपटासह शीबा आकाशदीप ‘प्यार का साया’ आणि ‘दम’ सारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे. तिने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यानंतर लवकरच ती हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर गेली.

१९९६ मध्ये शीबा आकाशदीपने आकाश दीपशी लग्न केले. विशेष म्हणजे आकाश दीपने पत्नी शीबाचे दोन चित्रपटही दिग्दर्शित केले आहेत. बरीच वर्षे फिल्मी पडद्यापासून दूर असलेल्या शीबाने छोट्या पडद्यावरून पुनरागमन केले, तेव्हा ती टीवी शो हासिल मध्ये दिसली होती.

शीबाचा जन्म १ जानेवारी १९७० रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला. पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या शीबाने हिंदी सिनेसृष्टीत ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांच्या ‘ये आग कब बुझेगी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. बॉलिवूडबरोबर शीबाने पंजाबी सिनेमातही आणि बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

आता इतक्या वर्षानंतर शिबा मध्ये खूपच बदल झाला आहे. चित्रपटाच्या पडद्यापासून दूर असली तरी ती तिच्या चाहत्यांशी नेहमी जोडली गेलेली असते. सोशल मीडियावर शीबा खूप अ‍ॅक्टिव्ह असल्याचे अनेकदा पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sheeba Akashdeep Sabir (@simplysheeba)

शेबा नेहमी आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. त्याचबरोबर ती आपल्या स्टाईलिश फिटनेस व्हिडिओंमुळे नेहमी चर्चेत असते. इंस्टाग्रामवर शीबा आकाशदीपला तीन लाख ११ हजाराहून अधिक लोक फॉलो करतात. सध्या ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडली गेली आहे. शीबा आणि आकाशदीप ह्रदय आणि भविष्य या दोन मुलांचे आई वडील आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like