एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘दिया और बाती हम’ मधील हा अभिनेता माहित आहे का? आता गावी जगत आहे साधारण जीवन, करतोय म्हणून शेती..

टीव्ही जगामधील अनेक टीव्ही शोनी  प्रेक्षकांचा मनावरती राज्य केले आहे. स्टार प्लसचा ‘दीया और बाती हम’ या मालिकेने हि फार कमी वेळात सर्वांच्या हृदयात स्वत: चे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेमधील संध्या बींधनी सूरज राठी यांच्या प्रेमकथेचे खूप कौतुक झाले आहे.

या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली दीपिका सिंह नंतर अनेक मालिकेमध्ये दिसली आहे. पण सूरज राठीची भूमिका करणारे अनस रशीद आता टीव्ही क्षेत्रापासून लांब राहणे पसंद करत आहेत. त्यांचा जन्म १९८० मध्ये पंजाबच्या मलेरकोटला जिल्ह्यात झाला आहे.

२००४ साली अनस यांनी प्रथमच ‘मिस्टर पंजाब’ हा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर ते टीव्ही इंडस्ट्रीकडे वळले. अनस यांचे शालेय शिक्षण उर्दू भाषेत झाले. यानंतर त्यांनी मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. अनस एक उत्तम अभिनेता होण्याव्यतिरिक्त, एक सक्षम-प्रशंसा करणारा गायक देखील आहे.

अनस याचे चुलत भाऊ मोहम्मद नाझीम आणि हबीब हे हि टीव्ही कलाकार आहे. उर्दू, अरबी आणि पर्शियन अशा भाषांचे ज्ञान असणारा हा अभिनेता सुरुवातीपासूनच एक टैलेंटेड व्यक्ती आहे.

अनास त्याची ओळख ‘दिया और बाती हम’ या मालिकेद्वारे असली तरी त्यांनी २००७ मध्ये स्टार प्लस शो ‘कहीं तो होगा’ पासून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. या मालिकेत त्यांनी कार्तिक नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. यानंतर त्यांनी ‘क्या होगा निम्मो का’, ‘ऐसे करो न वादा’, ‘धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान’ या सारख्या मालिकेत हि काम केले आहे. सूरज राठीची व्यक्तिरेखेतून त्यांची प्रत्येक घरा घरात ओळख झाली आहे.

अनसने २०१७ मध्ये हिना इक्बालशी लग्न केले आहे. विशेष म्हणजे हिना अनसपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. अनस आणि हिना यांनी २०१९ मध्ये आपल्या मुलाला जन्म दिला आहे.

अनसकडे टीव्ही जगतात बराच चर्चेत राहिला आहे. पण आता त्याला कॅमेर्‍यापासून दूर राहणे आवडते. कदाचित याच कारणास्तव तो आता मालेरकोटला परत आला आहे आणि तेथे आपले जीवन व्यथित करत आहे. एका मुलाखती दरम्यान अनस म्हणाला की, मी अभिनयाच्या जगातून ब्रेक घेत आहे. मला शेतीत खूप रस आहे, त्यामुळे या कामात माझे कुटुंब मला खूप सहकार्य करत आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like