एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

साऊथ इंडस्ट्रीमधील अंबानी म्हणून ओळखले जाणारे सुपरस्टार ‘मोहनलाल’ जगतात राजासारखी लाईफस्टाइल..पहा

अभिनेते मोहनलाल यांना मल्याळम चित्रपटसृष्टीचे अंबानी म्हणून ओळखले जाते. त्यांच्याकडची अमाप संपत्ती याला कारणीभूत आहे. या संपत्तीमुळेच त्यांची लाईफस्टाइलदेखील एखाद्या राजा-महाराजासारखी आहे.

पण ही सगळी संपत्ती त्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर कमवली आहे. त्यांना आजपर्यंत अनेक सन्मानांनी पुरस्कृत करण्यात आले आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्री बरोबरच त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohanlal (@mohanlal)

१२ मे १९६० रोजी मोहनलाल विश्वनाथन यांचा जन्म केरळ मधल्या एलांथुर गावी झाला. सहावीत असताना त्यांनी ‘कॉम्पुटर बॉय’ या नाटकात एका नव्वद वर्षांच्या माणसाची भूमिका केली होती. १९७७ आणि १९७८ च्या दरम्यान ते राज्यस्तरीय रेसलिंग चॅम्पियन होते.

१९७८ मध्ये म्हणजेच वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी आपला पहिला मल्याळम चित्रपट ‘थिरानोत्तम’ केला. पण सेन्सॉरशिप मुळे तो चित्रपट प्रदर्शित व्हायला तब्बल २५ वर्षे लागली. १९८० मध्ये ‘मांजिल विरिन्जा पुक्कल’ या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका केली आणि हा चित्रपट प्रचंड गाजला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohanlal (@mohanlal)

१९८३ मध्ये त्यांनी जवळपास २५ चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यातल्या बऱ्याच भूमिका या खलनायकाच्या होत्या. ‘गुड हार्ट’ चित्रपटात त्यांनी मुख्य नायकाची भूमिका निभावली. त्यानंतर त्यांचे बरेच चित्रपट आले जे बॉक्स ऑफिस वर हिट ठरले.

१९८६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘राजविंटे मकन’ या चित्रपटानंतर प्रेक्षक मोहनलाल यांना मल्याळम इंडस्ट्रीचे सुपरस्टार म्हणून ओळखू लागले. आजपर्यंत त्यांनी जवळपास ३४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी बऱ्याच नाटकांमध्येही कामे केली आहेत.

अभिनयाबरोबच मोहनलाल निर्माते, पार्श्वगायक, सूत्रसंचालक आणि डिस्ट्रिब्युटर देखील आहेत. त्यांना जसे अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत, तसेच त्यांना भारत सरकारकडून दोन अत्यंत गौरवास्पद पुरस्कार देखील मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohanlal (@mohanlal)

मल्याळम चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये पद्मश्री तर २०१९ मध्ये त्यांना पद्मभूषण या सर्वोच्च भारतीय नागरी सन्मानांनी पुरस्कृत करण्यात आलं. प्रादेशिक सेनेकडून २००९ मध्ये त्यांना ‘ल्युटीनन्ट कोलोनेल’ हे मानद पद बहाल करण्यात आले. असे पद मिळवणारे ते पहिले भारतीय अभिनेते आहेत.

आपल्या अभिनय कौशल्याने मोहनलाल यांनी बरीच कीर्ती आणि संपत्ती मिळवली. मात्र ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांचे अनेक रेस्टॉरंट्स आणि बिझनेस आहेत. त्यांनी ‘विश्वशांती फाऊंडेशन’ ही धर्मादाय संस्था उभारली. ही संस्था समाजातील वंचित लोकांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी काम करते.

You might also like