एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बजरंगी भाईजान’ फेम अभिनेत्री सापडली संकटात! उपचारासाठी नाहीत पैसे…

कोरोनाने अनेकांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे. सिनेसृष्टीला तर याचा खूप मोठा फटका बसला आहे. भारतातल्या बऱ्याच मोठ्या उद्योगांपैकी सिनेसृष्टी हा एक उद्योग आहे.

इथे हजारो लोक काम करतात. मात्र कोरोनाच्या काळात या सगळ्यांच्याच हातचे काम गेले आहे. आता बऱ्याच जणांची साठवलेली पुंजी संपत आल्याने पुढे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. संपलेले पैसे आणि त्यात उद्भवलेलं आजारपण यामुळे एक अभिनेत्री आर्थिक संकटात सापडली आहे.

‘बजरंगी भाईजान’ फेम अभिनेत्री सुनीता शिरोळे यांना सध्या आर्थिक अ’डच’णींचा सामना करावा लागतोय. अशातच त्यांना किडनीचा त्रा’स सुरू झाल्याने सतत वैद्यकीय उपचार घेणे क्रमप्राप्त झाले आहे. या उपचारांच्या वाढत्या खर्चामुळे सुनीता यांच्यावरचा आर्थिक बोजा वाढला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या किडनीच्या आजारामुळे आणि गुडघेदुखीच्या समस्येमुळे त्यांना नुकतेच रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunita Shirole (@sunitashirole)

दरम्यान रुग्णालयात उपचार घेत असताना सुनीता दोन वेळा पडल्या. यामुळे त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. यामुळे त्यांना त्यांच्या पायाची हालचाल करणेही अशक्य झाले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती. वाढत्या वयामुळे त्यांना इतरही व्याधींचा सामना करावा लागतोय.

इटाइम्सच्या रिपोर्टनुसार, सुनीता शिरोळे सध्या अभिनेत्री नुपूर अलंकार यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून त्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे या फ्लॅटचे भाडे भरणे देखील त्यांना जमले नाहीये.

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (CINTAA) नूपुरला त्यांची मदत करण्याविषयी सांगितले आहे आणि याबद्दल सुनीता यांनी त्यांचे आभार मानले आहेत. नुपूर सुनीता यांना त्यांच्या घरी घेऊन गेल्या. त्यांची काळजी घेण्यासाठी व मदत करण्यासाठी नुपूर यांनी एक पगारी नर्सदेखील ठेवली आहे.

सुनीता शिरोळे यांनी मराठी मध्ये ‘शापित’, तर हिंदी मध्ये द लेजंड ऑफ भगतसिंग, बजरंगी भाईजान, मेड इन चायना या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच किस देस में है मेरा दिल, मिसेस कौशिक की पाँच बहुऍ या मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

को’रोना’च्या आधी त्या काम करत होत्या. त्यानंतरच्या काळात त्यांनी जमवलेले सेव्हिंगचे पैसे हाच त्यांचा आधार होता. त्यांना सध्या दवाखान्यात दाखल व्हावे लागले आहे. “मी पुन्हा चालू शकेन की नाही हे मी सांगू शकत नाही. मला परत उभे राहण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या.

You might also like