एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील अक्षयाच्या बहिणीला ओळखले का? तिने देखील केले आहे चित्रपटात काम..

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधली गोड लतिका सर्व प्रेक्षकांची आवडती आहे. ही भूमिका निभावली आहे अक्षया नाईक या अभिनेत्रीने. या अभिनेत्रीची ही पहिलीच मराठी मालिका आहे. यापूर्वी तिने ‘ये रिश्ते है प्यार के’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सारख्या हिंदी मालिकांमधून काम केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

अक्षयाला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. अक्षयाने आपल्या अभिनयाची झलक तर दाखवून दिली आहेच. तिच्या सोशल मीडिया अकाऊंट ला भेट दिली असता तिच्या दिलखुलास नृत्याची देखील झलक पाहायला मिळेल.

अक्षया खूपदा आपल्या बहिणीबरोबर डान्स करताना दिसते. तुम्हाला माहीत आहे का, की अक्षयाच्या बहिणीने देखील या आधी एका चित्रपटात काम केले आहे? होय, अक्षयाच्या बहिणीने या अशी बालकलाकार म्हणून काम केले आहे.

अक्षयाच्या बहिणीचे नाव अक्षता नाईक आहे. तिने १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्ञानेश्वरी’ या मराठी चित्रपटात ज्ञानेश्वरीची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या चित्रपटात निशिगंधा वाड, रमेश भाटकर, कुलदीप पवार, सुहास पळशीकर, सयाजी शिंदे, नंदू माधव यांसारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. मात्र चिमुकल्या ज्ञानेश्वरीची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली.

Image:lokmat

‘ज्ञानेश्वरी’ चित्रपटात छोट्या ज्ञानेश्वरीचे अ’प’ह’रण झाल्यानंतर तिच्यामुळे अ’प’ह’रणकर्त्यांचे जीवन बदलून जाते, अशी साधारण कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती अरविंद नाईक यांनी केली होती. त्यांच्या ‘अक्षता प्रोडक्शन्स’ तर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. निर्माते अरविंद नाईक हे अक्षता नाईक आणि अक्षया नाईक यांचे वडील आहेत.

‘ज्ञानेश्वरी’ चित्रपटानंतर अक्षता नाईक आपल्याला बाकी कोणत्या चित्रपटांमध्ये दिसली नाही. आता जवळपास २३ वर्षांनी तिचे फोटो बघितल्यावर ती चिमुकली ‘ज्ञानेश्वरी’ हीच आहे हे ओळखणे फार कठीण आहे. मात्र आता ती खूपच सुंदर दिसते. अभिनयापासून लांब असली तरी तिची ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. अक्षताचे लग्न झाले आहे. ती तिच्या कुटुंबाबरोबर मुंबई मध्ये राहते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshata Naik (@akshata.a.naik)

अक्षताला देखील अक्षयासारखी नृत्याची आवड आहे. दोघी बहिणींच्या डान्सचे व्हिडिओ आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वर बघता येऊ शकतात. अभिनय क्षेत्रात नसली तरी अक्षता ज्या क्षेत्रात काम करत आहे त्यात तिला यश मिळो, हीच सदिच्छा. बाकी अक्षया तर रोज ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधून आपल्या भेटीला येतच असते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

You might also like