एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

देवसेना पासून नागार्जुनच्या सुनेपर्यंत साऊथ मधील या ९ प्रसिद्ध अभिनेत्री एका चित्रपटासाठी घेतात एवढी भरमसाठ फीस..जाणून व्हाल थक्क

सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीपेक्षा जास्त सर्वत्र चर्चेत असणारी इंडस्ट्री म्हणजेच साऊथ फिल्म इंडस्ट्री. बॉलिवूडप्रमाणेच साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये हि एकापेक्षा एक सुंदर आणि बो’ल्ड अभिनेत्र्या आहेत. साऊथ मधील चित्रपट निर्माते या अभिनेत्रींवरती खूप पैसे खर्च करत असतात. अनुष्का शेट्टीपासून नागार्जुनची सून समांथा अक्किनेनी या अभिनेत्री साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक हाईएस्ट पेड अभिनेत्रींमध्ये मोजल्या जातात.

साऊथ मधील या अभिनेत्री एका चित्रपटासाठी कोट्यावधी फीस घेत असतात. परंतु त्यांना बॉलिवूड नायिकांच्या तुलनेत समान फी मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला या लेखामधून साऊथ मधील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या मानधनाबद्दल सांगणार आहोत.

१.अनुष्का शेट्टी: बाहुबलीची देवसेना म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी या यादी मध्ये पहिल्या स्थाना वरती आहे. ती एका चित्रपटासाठी जवळजवळ ४ ते ५ कोटी रुपये फीस घेते. अनुष्काने अद्याप इतर नायिकाप्रमाणे बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करू शकते.

२.सामंथा अक्किनेनी: सध्या वेब सीरिज फॅमिली मॅनमुळे सर्वत्र चर्चेत असणारी अभिनेत्री सामंथा अक्किनेनी एका चित्रपटात काम करण्यासाठी ३ ते ४ कोटी रुपये घेते. सामंथाने अद्याप बॉलिवूड चित्रपटांत डेब्यू केलेला नाही.

३.काजल अग्रवाल: लग्नानंतरही काजल अग्रवालचा दर्जा इंडस्ट्रीमध्ये कमी झालेला नाही. एका चित्रपटात काम करण्यासाठी काजल तब्बल ३-४ कोटी रुपये घेते. याशिवाय तिने बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये हि काम केलं आहे. तिचे बॉलिवूडमधील काही चित्रपट हि ब्लॉकबस्टर असल्याचे सिद्ध झाले आहे.

४. पूजा हेगडे: काही काळापूर्वी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करणारी पूजा हेगडे एका चित्रपटासाठी ३-४ कोटी रुपये घेते. पूजाने अल्पावधीतच दक्षिण इंडस्ट्रीत आपले स्थान निश्चित केले आहे. अहवालानुसार ती सलमान खानचा आगामी चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’ मध्ये काम करताना दिसू शकते.

५. श्रुती हासन: कमल हासनची मुलगी श्रुती हासननेही साऊथ चित्रपट इंडस्ट्री मध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रुती एका चित्रपटासाठी ३-४ कोटी घेते. तिने काजल प्रमाणे बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले, परंतु येथे तिला फारशे यश मिळू शकले नाही.

६. तमन्ना भाटिया: मन्ना भाटियाचे नाव दक्षिणच्या सुंदर नायिकांमध्ये आहे. एका चित्रपटासाठी ती २-३ कोटी घेते. तमन्नाहने अजय देवगणच्या हिम्मतवाला चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

७.रकुलप्रीत सिंग: रकुल एका चित्रपटासाठी २-३ कोटी मानधन घेते. तिला साऊथ चित्रपटांमध्ये जितके यश मिळाले तेवढे बॉलिवूडमध्ये मिळवता आले नाही.

८.तापसी पन्नू: बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यापूर्वी तापसी पन्नू दक्षिणची सुपरस्टार म्हणून काम करत आहे. आजही दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये तापसीचे नाव घेतले जाते. ती एका चित्रपटासाठी २-३ कोटी फीस घेते.

९.श्रेया सरन: श्रेया सरन एका चित्रपटासाठी २-३ कोटी फेस घेते. श्रेयाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर ती बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती अजय देवगनच्या दृश्यम या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like