एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दुःखद! राष्ट्रीय पुरस्कार विजेते साऊथच्या या प्रसिद्ध अभिनेत्याचे अपघाती निधन, परिवाराने घेतला अवयवांचे दान करण्याचा निर्णय

कन्नड अभिनेता सांचरी विजय यांचे सोमवारी बंगळूरमधील रुग्णालयात निधन झाले आहे. १३ जूनच्या रात्री दुचाकीवरून घसरल्याने त्याचा अपघात झाला. ज्यामुळे त्याच्या मेंदूला दुखापत झाली होती. या अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती खूपच गंभीर होती म्हणून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. परंतु असे असूनही डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.

सांचारी विजय यांनी १४ जून रोजी अखेरचा श्वास घेतला. आपल्या मुलाच्या निधनानंतर विजयच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुचाकी घसरल्यामुळे झाला होता अपघात:
वृत्तानुसार शनिवारी रात्री ११.४५ च्या सुमारास संचारी आपल्या मित्रासह औषध घेण्यासाठी दुचाकीवरून बाहेर गेले होते. पावसामुळे रस्ते खूप ओले झाले होते, त्यामुळे त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ते घसरले, असे विजयचा मित्र नवीनने सांगितले. त्यांची दुचाकी थेट विजेच्या खांबावर आदळली.

या अपघातात नवीनच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून संचारी विजय गंभीर जखमी झाले. त्याच्या डोक्याला आणि मांडीला गंभीर दुखापत झाली होती. घटनेनंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात आणले गेले आणि शस्त्रक्रिया झाली. परंतु डॉक्टरांनी उत्तम प्रयत्न करूनही अभिनेत्याला वाचवण्यामध्ये यश आले नाही.

परिवाराने घेतला अवयवांचे दान करण्याचा निर्णय:
सांचारी विजय यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदान करून समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की विजयच्या मेंदूत काम करणे थांबले आहे आणि त्याच्या अस्तित्वाची फारशी आशा नव्हती. म्हणून आम्ही त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपणा सर्वांना ठाऊकच आहे की समाज सेवा मध्ये सांचारी नेहमीच पुढे राहिली आहे. त्यांनी नेहमीच लोकांच्या भल्यासाठी काम केले आहे. कोरोना विषाणूसारख्या साथीच्या रोगामध्ये त्यांनी २४ तास सर्वांच्या सेवेत काम केले आहे.

नानू चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते:
सांचारी विजय कर्नाटकातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक होते. हे कलाकार कर्नाटकच्या थिएटर सर्कलमधील सुप्रसिद्ध अभिनेते होते. सन ११ मध्ये कन्नड चित्रपट ‘रंगप्पा होगाबिटाना’ या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘नानू अवनाला अवलू’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयाबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. किलिंग वीरप्पन आणि नाथीचरामी सारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.

संचारी विजय यांनी कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यास मदत केली होती. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांमध्ये आणि चित्रपटाच्या जगात शोककळा पसरली आहे. प्रत्येकजण त्यांना आदरांजली वाहात आहे.

 

You might also like