एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘माझ्या फाउंडेशन मधील प्रत्येक रुपया गरजूंसाठी’; आयकर विभागाच्या आ’रोपांनंतर सोनू सूद ची प्रतिक्रिया

कोरो’ना काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्या कामामुळे बराच चर्चेत आला होता. या काळात त्याने अनेक गरजूंना मदत केली होती. बऱ्याच लोकांना त्याने घरी परतण्यासाठी वाहनांची सोय करून दिली. काही लोकांना त्याने आर्थिक सहाय्य देखील देऊ केले होते. लोकांचा ‘मसीहा’ झालेल्या सोनू सूदची त्यामुळे बरीच चर्चा झाली. मध्यंतरी त्याच्या राजकारण प्रवेशाचीही चर्चा जोरदार रंगली होती. सध्या मात्र तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

सोनू सूद याच्या घराचे आणि कार्यालयाचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान आयटी विभागाने मुंबईतील त्याच्या जवळपास सहा ठिकाणांचा सर्व्हे केला. सारे काही आलबेल असेल असे वाटले होते मात्र आयकर विभागाने या पार्श्वभूमीवर एक मोठा खु’लासा केल्याने सगळ्यांनाच ध’क्का बसला आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, सोनू सूदचा २० कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या करचोरी मध्ये सहभाग आहे. आयकर विभागाच्या या आरोपानंतर पहिल्यांदाच सोनू सूद ने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सोनूने आपल्या ट्विटर हॅण्डल वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर त्याने ‘सख्त राहों में भी आसान सफर लगता है, हर हिंदुस्तानी की दुवाओं का असर लगता है’ अशी कॅप्शन देखील दिली आहे. आपल्या या पोस्ट मध्ये सोनू म्हणतो, ‘तुम्हाला नेहमीच तुमची बाजू मांडायची गरज नसते. काळच यावरचं उत्तर आहे.

भारतीयांच्या सेवेसाठी मी माझे मन आणि शक्ती अर्पण करण्याची प्रतिज्ञा केली आहे. माझ्या फाउंडेशनचा प्रत्येक रुपया हा अनमोल आयुष्य वाचवण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी आहे. मी बऱ्याचदा अनेक ब्रॅंड्सना माझी एन्डॉर्समेंट फी ही मानवी कल्याणासाठी दान करण्याचे आवाहन केले आहे.’ यामध्ये सोनू पुढे म्हणतो, ‘गेले चार दिवस पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होतो त्यामुळे तुम्हाला भेटता आले नाही. आता मात्र मी परत तुमच्या सेवेत रुजू झालो आहे.’

आयकर विभागाने दिलेल्या वृत्तानुसार, सोनू सूदच्या ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’ ने देशाबाहेरील देणगीदारांकडून २.१ कोटी रुपये गोळा केले होते. मात्र यात एफसीआरए नियमांचे उ’ल्लंघ’न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षी त्यांनी जवळपास १८ कोटी रुपये गोळा केले होते, त्यापैकी १.९ कोटी रुपये मदत कार्यासाठी खर्च झाले असून बाकी पैशांचा काहीही उपयोग करण्यात आलेला नाही.

You might also like