एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मालिकेच्या चाहत्यांना धक्का! हे मुख्य पात्र आता नाही दिसणार मालिकेत…

झी मराठी वरील ‘देवमाणूस’ या मालिकेने वाहिनी आणि प्रेक्षक असे दोघांनाही तारल्याचे दिसत आहे. झी मराठी वाहिनीचा घसरलेला टीआरपी या मालिकेने पूर्वपदावर आणून ठेवला. तसेच प्रेक्षकांनाही काहीतरी नवीन विषय सादर करत खिळवून ठेवले आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म च्या जमान्यात श्वेता शिंदे निर्मित ‘देवमाणूस’ ही मालिका लोकांना पुन्हा छोट्या पडद्याकडे खेचून आणण्यात यशस्वी झाली आहे. मालिकेची कथा आणि यातले कलाकार यांना या यशाचे श्रेय जाते.

मालिकेने सध्या अनेक नव्या ट्विस्ट सह टीआरपी चा नवा उच्चांक गाठला आहे. मालिकेतले सगळेच कलाकार आता प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. मालिकेतली मुख्य पात्रांनी तर प्रेक्षकांची मने जिंकली आहेतच, पण त्याचबरोबर मालिकेतल्या इतरही पात्रांनी प्रेक्षकांना आपलेसे करून घेण्यात यश मिळवले आहे.

यात काही पात्रे ही केवळ प्रासंगिक असल्याने त्यांचा रोल संपल्यानंतर त्यांना मालिकेला टाटा बायबाय म्हणावं लागलं आहे. आता याच यादीत अजून एक नाव वाढलं आहे.

‘देवमाणूस’ मालिकेतले आर्या देशमुख हे पात्र प्रेक्षकांच्या खूप जवळचं होतं. मात्र आता या पात्राला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे. आर्या देशमुख हे पात्र सोनाली पाटील या अभिनेत्रीने साकारलं आहे. सध्या या पात्राचे मालिकेतील काम संपले असल्याने पुढच्या काही भागांमध्ये सोनाली अर्थात आर्या देशमुख प्रेक्षकांना दिसणार नाहीये. मित्रहो, ‘देवमाणूस’ ही काही सोनालीची पहिली मालिका नाहीये.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Patil (@sonalipatil_official)

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘वैजू नं. १’ या मालिकेने सोनाली पाटील हे नाव प्रकाशझोतात आलं. या मालिकेतील मध्यवर्ती भूमिका अर्थात वैजूची प्रमुख भूमिका सोनाली पाटीलने केली होती. ही व्यक्तिरेखा लोकांना फारच आवडून गेली होती. तसेच लोक ‘देवमाणूस’ मालिकेतील तिच्या आर्या देशमुख या पात्रावर देखील तितकेच प्रेम करताना दिसून येत आहेत.

सोनाली पाटील चा जन्म लातूर चा असला तरी तिचं बालपण कोल्हापूरात गेलं आहे. तिथेच ती लहानाची मोठी झाली. सोनाली ची अजून एक ओळख आहे. टिकटॉक स्टार. सोनालीचे टिकटॉक व्हिडिओ खूपच प्रसिद्ध आहेत. तिथून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Patil (@sonalipatil_official)

तिथेही लोकांनी तिला बरीच पसंती दिल्याचे दिसून येते. सध्या मात्र प्रेक्षकांना या गुणी अभिनेत्रीला ‘देवमाणूस’ मालिकेत पाहता येणार नाहीये. कथानकात बदल झाल्यास ती पुन्हा मालिकेतून प्रेक्षकांना भेटायला येईल, अशी आशा करूया.

You might also like