एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सोनालीच्या ग्लॅमरस फोटोंऐवजी होतेय तिच्या मंगळसूत्राची चर्चा! मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करणाऱ्या सोनालीचे फोटो व्हायरल..

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णीने दुबईमध्ये लग्नगाठ बांधत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. ७ मे २०२१ ला तिने कुणाल बेनोडेकर सोबत लगीनगाठ बांधली. कोरोना परिस्थितीमुळे जुलै मध्ये होणारे लग्न तिने मे महिन्यातच उरकून घेतले. दोघांच्या घरच्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत या दोघांचा हा छोटेखानी विवाहसोहळा पार पडला. धूमधडाक्यात लग्न करता येत नसल्याने या दोघांनी कोर्ट मॅरेज केले आहे. गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसादिवशी तिने आपल्या साखरपुड्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती.

यावर्षीदेखील आपल्या वाढदिवसादिवशी तिने आपल्या लग्नाची ही बातमी चाहत्यांसमोर जाहीर केली. तासाभरात लग्नाची खरेदी केल्याचेही तिने यावेळी आपल्या चाहत्यांना सांगितले. वरमाला, मंगळसूत्र आणि कुंकू या तीनच गोष्टींची खरेदी करत या दोघांचे लग्न अगदी १५ मिनिटांत पार पडले. सध्या सोनाली आणि कुणाल दोघेही मालदीव मध्ये आपली सुट्टी एन्जॉय करत आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनालीने तिथले फोटो सोशल मीडिया वर अपलोड केले होते. तिच्या बि’की’नी लूक मधले फोटो बरेच व्हायरल झाले. कधी बि’की’नी तर कधी टू पीस मध्ये सोनाली खूपच हॉ’ट आणि ग्लॅ’म’रस दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

मात्र या फोटोंनंतर या फोटोंपेक्षाही या फोटोंमधली अजून एक गोष्ट व्हायरल होत आहे. ती म्हणजे सोनालीचे ट्रेंडी मंगळसूत्र. तिच्या वेगवेगळ्या बि’की’नी आणि टू पीस वर तिने वेगवेगळे मंगळसूत्र घातले आहे. लाल रंगाच्या आऊटफिटवर सिल्व्हर चेन मंगळसूत्र तर काळ्या रंगाच्या टू पीस आऊटफिटवर सिल्व्हर पर्ल मंगळसूत्र सोनालीने घातले आहे. दिसायला अगदी साधे पण तितकेच आकर्षक अशा या मंगळसूत्रांची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

मालदीवमधून आपल्या इन्स्टा लाईव्ह मध्ये चाहत्यांशी संवाद साधताना तिने या मंगळसूत्रांबाबत खुलासा केला. तिने आपले मंगळसूत्र आद्या ब्रॅंडकडून बनवून घेतले आहे. “मला साधे आणि ट्रेंडी डिझाईनचे मंगळसूत्र हवे होते. त्यामुळे मी आद्या ब्रॅंडकडून या मंगळसूत्राची निवड केली,” असे सोनालीने यावेळी सांगितले. नाजूक असे डिझाईन असणारी ही मंगळसूत्रे खूपच आकर्षक आहेत. सोनालीच्या मूळच्या सुंदर रूपामध्ये या मंगळसूत्रांनी अजूनच भर घातली आहे.

मंडळी, तुमच्या या लाडक्या अभिनेत्रीचा कोणता लूक तुम्हाला जास्त आवडला? तसेच तिच्या मंगळसूत्राचे तुम्हाला आवडलेले डिझाईन कोणते, हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. आमचे लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.

You might also like