एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अबब! सीतेच्या भूमिकेसाठी कंगना घेतेय इतके पैसे! मानधनाचा आकडा ऐकून थक्क व्हाल…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत तर हल्ली कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. कधी ती कोणत्या तरी गोष्टीवर धाडसी वक्तव्य करून रिकामी होते, तर कधी तिच्या अशा वक्तव्यांनी तिच्यावर अनेक संकटेही येतात. एकूणच काय, तर कंगना नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय बनून राहिली आहे. नुकताच तिचा ‘थलायवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या चर्चांना विराम मिळतो न मिळतो, तोच आता एका नव्या चित्रपटामुळे ती चर्चेत आली आहे.

‘सीता’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. या चित्रपटात सीतेची मध्यवर्ती भूमिका करण्यासाठी करीना कपूर खान चे नाव समोर आले होते. मात्र ही बातमी ऐकताच अनेक लोकांनी यावर आपला आक्षेप नोंदवला आहे. करीनाने या चित्रपटासाठी १२ कोटी रुपयांचे मानधन मागितल्यावर तर अनेक जणांनी सोशल मीडिया वर या वि’रो’धात बोलायला सुरवात केली.

करीनाला सीतेच्या भूमिकेत घेतले तर आम्ही तिला बॉ’य’कॉट करू, चित्रपटाचे प्रदर्शन हाणून पाडू, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. हे सगळे कमीच होते, म्हणून मग बजरंग दलानेही या वा’दा’त उडी घेतली. ‘तू सीतेची भूमिका कर, मग आम्ही बघतोच’ असा धमकीवजा इशारा करीनाला बजरंग दलाकडून देण्यात आला. या सगळ्या गदा’रो’ळानंतर करीनाचे नाव या यादीतून काढले गेले.

आता तिच्या जागी कंगना राणावतची वर्णी या भूमिकेसाठी लागली आहे. अजून तिच्या मानधनाबद्दल अधिकृत बातमी जाहीर झाली नाहीये. मात्र एका वृत्तानुसार, कंगनाने तब्बल ३२ कोटी रुपये इतके मानधन या चित्रपटासाठी मागितले आहे. कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला या आधी इतके मानधन मिळालेले नाही. जर कंगनाला हे मानधन मिळाले, तर ती बॉलिवूडमधील सगळ्यांत जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरेल.

केआरके अर्थात कमाल आर खान ने आपल्या व्हिडिओ मध्येही हाच दावा केला आहे. बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच एखाद्या अभिनेत्रीला इतके मानधन देण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे. केआरके चा हा दावा किती खरा आहे, याची काही कल्पना नाही. मात्र एकूणच सध्या कंगनाचे भाव वधारल्याचे चित्र आहे.

येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला याबद्दल ठोस माहिती हाती लागेल, अशी अ’पे’क्षा करायला हरकत नाही. अशी एखादी माहिती हाती आल्यास आम्ही तुम्हाला आमच्या लेखांमधून लगेच कळवूच. त्यासाठी आमचे लेख नियमितपणे वाचत चला.

You might also like