एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ठरलं..बहुचर्चित ‘सीता’ चित्रपटामध्ये करीना कपूर नाही तर हि हिंदू अभिनेत्री करणार काम!

'सीता' चित्रपटासाठी करीनाच्या जागी या अभिनेत्रींचे नाव येतेय समोर पहा..

सध्या चित्रपटसृष्टीत बरेच बिग बजेट सिनेमे येऊ घातले आहेत. यापैकी बरेचसे चित्रपट हे पौराणिक कथांवर आधारलेले आहेत, विशेषतः रामायणावर. बरेच निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक आपल्या आपल्या दृष्टिकोनातून रामायण नवीन पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रामायणातलं प्रत्येक पात्र खरंतर एका नव्या पुस्तकाचा विषय होऊ शकेल. रामायणातील अशाच एका पात्रावर चित्रपट करण्याचे शिवधनुष्य आता निर्मात्यांनी पेलले आहे.

रामायणातील ज्या पात्रामुळे खरे रामायण घडले ते पात्र आहे सीतेचे. रावणाने सीतेचे हरण केले आणि तिला सोडवून आणण्यासाठी रामायण घडले. पण यापलीकडेही सीतेचे अनेक पैलू आहेत. हेच पैलू या चित्रपटातून दाखवण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. ‘बाहुबली’ चित्रपट मालिकेचे लेखन करणारे लेखक के.व्ही. विजयेंद्र प्रसाद या नवीन ‘सीता- द इनकार्नेशन’ चित्रपटाचे लेखन करणार आहेत. के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी बराच चर्चेत आला आहे. चित्रपटाचे जवळपास तीनशे कोटींचे बजेट हाही एक मुद्दा असला तरी या चित्रपटाच्या शूटिंग बद्दलही बरीच चर्चा आहे. या चित्रपटाचे शूटिंग बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांबद्दलदेखील लोकांमध्ये उत्सुकता आहे.

आधी या चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी करीना कपूर-खान चे नाव समोर आले होते. तिने या चित्रपटासाठी बारा कोटी रुपयांचे मानधन मागितल्याची देखील चर्चा होती. यामुळे करीनाला लोकांनी सोशल मीडिया वरून बरेच ट्रोल पण केले होते. पण ‘सीता- द इनकार्नेशन’ च्या निर्मात्यांनी ही केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे. त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी कधीच करीनाला या चित्रपटासाठी विचारले नव्हते.

आता या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी कंगना राणावत चे नाव पुढे आले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ‘सीता- द इनकार्नेशन’ चे स्क्रीन रायटर के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी कंगनाचे नाव या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी सुचवले आहे. त्यांच्या मते, कंगना या भूमिकेमध्ये शोभून दिसेल. आता या भूमिकेसाठी कंगनाची निवड नक्की आहे का हे आपल्याला काही दिवसांत कळेलच. तोपर्यंत आपल्याला या चित्रपटाबद्दल अजूनही काही अपडेट्स मिळत राहतीलच.

अशाच काही आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे आर्टिकल्स नियमितपणे व्हिजिट करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा.

You might also like