एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

संघर्षातून मिळवले होते यश पण कष्टाची भाकर खाण्यापूर्वी सिद्धार्थ शुक्ला यांचा दीप विजला, कपूर हॉस्पिटलमध्ये झाले दुर्दैवी नि’ध’न…

बॉलिवूड मध्ये बिग बॉसमध्ये एन्ट्री करण्याचे खूप जणांचे स्वप्न असते कमी वेळेत स्वतःला फेम देण्यासाठी आणि सगळ्यांमध्ये एक ओळख निर्माण होण्यासाठी बिग बॉस हा एक उत्तम पर्याय आहे. पण बिग बॉस मधून कलाकारांचे खरे रूप लोकांसमोर येत असते. पण एकदा का माणसाला फेम मिळाला की तो स्वतःच्या धुंदीत जाऊन पोहचतो. पण बिग बॉस विजेता ठरणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.

यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते अशीच मेहनत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांनी बिग बॉस १३ चा विजेता होताना लावली होती. पण किती जरी आपल्याला यश प्राप्त झाले तरी पुढच्या क्षणी काय होईल याचा काही नियम नसतो. बॉलिवूड मधील खूप साऱ्या नव्या पिढीच्या कलाकारांनी २०-२१ मध्ये जगाचा निरोप घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

बिग बॉस सीझन -१३ चे विजेते सिद्धार्थ शुक्ला यांचे हृद’य’विकाराच्या झटक्याने गुरुवारी नि’ध’न झाले. सिद्धार्थ हे फक्त ४० वर्षांचे होते. माणूस म्हातारपणात जाऊ लागला की तो खूप साऱ्या गोष्टींची स्वप्न रंगवून ठेवत असतो मग ते आपले फॅमिली प्लॅनिंग असेल किव्हा बाकीच्या गोष्टी! पण जाताना माणूस आपण मिळवलेल्या खूप साऱ्या यशाचा पैसा घेऊन जाऊ शकत नाही.

सिद्धार्थ यांच्याबद्दल सांगितले जात आहे की बुधवारी रात्री प्रकृती बिगडल्यामुळे त्यांनी झोपायच्या आधी काही औषधे घेतली होती. सिद्धार्थने २००५ मध्ये मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थने इंटिरिअर डिझाईनचा अभ्यास केल्यानंतर २००४ मध्ये ‘ग्लॅड्रॅग्स मॅनहंट मेगामोडेल कॉन्टेस्ट’ मध्ये भाग घेतला आणि त्यात तो उपविजेता ठरला, त्यानंतर त्यांनी म्युझिक अल्बम मध्ये अभिनय केला, हे गाणे ‘इला अरुण’ या गायकाने गायले होते त्यात त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

२००५ मध्ये, सिद्धार्थने तुर्कीमध्ये आयोजित जागतिक सर्वोत्कृष्ट मॉडेल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि ते पद जिंकून नाव मिळवले. या स्पर्धेत ते विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय सोबत पहिले आशियाई मॉडेल बनले.

या विजयानंतर त्यांना बजाज अॅव्हेंजर, आयसीआयसीआय आणि डिग्जमच्या जाहिराती मिळाल्या. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली. सिद्धार्थ यांना ‘बालिका वधू’ मधील भूमिकेसाठी खूप नावाजले जाते. पण कमी वयातील त्यांच्या नि’धनामुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे.

You might also like