एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट होतेय व्हायरल! हे आहे कारण…

टीव्ही स्टार अभिनेता सिद्धार्थ शुक्ला च्या बातमीने सारा देश हादरून गेला आहे. बालिका वधू, दिल से दिल तक सारख्या मालिकांमधून प्रसिद्धी मिळालेल्या या कलाकाराने २ सप्टेंबर रोजी या जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थच्या चाहत्यांना या बातमीमुळे खूप धक्का बसला आहे. त्याच्या या अशा अचानक एक्झिट मुळे इंडस्ट्री मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट मनाला चटका लावत आहे.

रिपोर्ट नुसार, सिद्धार्थ शुक्ला चा मृ’त्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. ४०वर्षीय या अभिनेत्याकडे बघताना कधीच कोणाला वाटले नव्हते की तो एक दिवस असा अचानक हे जग सोडून निघून जाईल. असे म्हटले जात आहे, की सिद्धार्थ रात्री एक औषध घेऊन झोपला होता. हे कोणते औषध आहे हे समजू शकलेले नाही. मात्र रात्री झोपलेला सिद्धार्थ सकाळी उठू शकला नाही. झोपेतच त्याचा मृ’त्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सिद्धार्थ ने २४ ऑगस्ट रोजी एक पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केली होती. यामध्ये त्याच्या हातात एक पांढरा फलक आहे ज्यावर ईसीजी लाईन आहे. ही लाईन हॉस्पिटल मध्ये ईसीजी मशीन वर माणसाच्या हृदयाचे काम चालू आहे हे दाखवण्यासाठी असते. ही लाईन सरळ आली तर माणूस मेला असे घोषित केले जाते. आज सिद्धार्थच्या बाबतीत ही लाईन सरळ आली आहे.

त्याने या फलकावर हॅशटॅग टाकून #TheHeroesWeOwe असे लिहिले आहे. या हॅशटॅगचा अर्थ आहे ‘नायक ज्यांचे आम्ही देणे लागतो’. ही पोस्ट को’व्हीड-१९ योद्ध्यांसाठी आहे. या पोस्टममधून त्याने लोकांना वाचवण्यासाठी आपले प्रा’ण पणाला लावणाऱ्या सगळ्यांना सलाम केला आहे. या पोस्ट मधून सिद्धार्थने मेडिकल आणि नर्सिंग स्टाफ साठी समर्पित केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

सिद्धार्थने शेअर केलेल्या पोस्ट वर ती ईसीजी लाईन माणूस जिवंत असल्याची खूण आहे. मात्र दुर्दैवाने ही जिवंतपणाची निशाणी सिद्धार्थसाठी मात्र त्याच्या शेवटाची निशाणी ठरली आहे असेच दिसून येत आहे. या अजब योगायोगामुळे चाहत्यांचे डोळे भरून येत आहेत. ‘आज तक’ च्या अहवालानुसार, सिद्धार्थ शुक्ला चा मृ’तदे’ह पो’स्टमा’र्टम साठी कूपर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला होता. तेथे त्याचे पो’स्टमार्ट’म झाल्यानंतर त्याचा मृ’त्यू हृदयविकराच्या झटक्याने झाल्याची पुष्टी करण्यात आली.

You might also like