एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आलिया आणि जॅकलिनला सोडून आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या सुंदर अभिनेत्रींच्या प्रेमात झालाय वेडा..

बॉलिवूड साठी ब्रेकअप आणि पॅचअप च्या बातम्या नवीन नाहीत. रोज कुठल्या ना कुठल्या तरी अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या अ’फेयरच्या बातम्या इंडस्ट्रीत पसरतच असतात. त्यातल्या किती खऱ्या आणि किती खोट्या हे मात्र कोणीच सांगू शकत नाही.

आघाडीच्या स्टार्स बद्दलच्या या बातम्या तर रोजच्याच असतात. आता हेच बघा ना, सिद्धार्थ मल्होत्रा च्या जुन्या अ’फेयर्स च्या बातम्या संपत नाहीत तोपर्यंत नवीन अफे’यरची चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहे ही नवीन व्यक्ती जिच्याबरोबर सिद्धार्थच्या अ’फेयरच्या चर्चा रंगत आहेत? ती आहे अभिनेत्री तारा सुतारीया. ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ (२०१९) मध्ये ताराने काम केले आहे. त्यावेळी तिचे नाव त्या चित्रपटातील अभिनेता टायगर श्रॉफ बरोबर जोडण्यात आले होते. मात्र आता असे काय झाले की तिच्या आणि सिद्धार्थ मल्होत्रा च्या अ’फेयर च्या चर्चांना उधाण आले आहे?

तसं पाहायला गेलं तर सिद्धार्थचे नाव त्या प्रत्येक अभिनेत्रीबरोबर जोडलं जातं जिच्याबरोबर तो चित्रपटात काम करतो. आतापर्यंत त्याच्या आलिया भट ला डे’ट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. सिद्धार्थ आणि आलिया आपले रिलेशन लपवत असल्याचेही बोलले जात होते. पण आता आलिया रणबीर कपूर ला डे’ट करत असल्याने या अफवांवर पडदा पडला आहे.

नंतर सिद्धार्थ जॅकलिन फर्नांडीस ला डे’ट करत असल्याचे बोलले जात होते. पण हे रिलेशन ते लपवू शकले नाहीत असे बोलले जाते. आता मात्र सिद्धार्थ आणि तारा सुतारीया च्या अ’फेयर च्या जोरदार चर्चा सुरू आहेत. दोघांना बऱ्याच वेळा एकत्रित बघण्यात आले आहे.

या दोघांची ओळख कारण जोहरमुळे झाली असल्याचे कळते. करण दोघांचाही कॉमन फ्रेंड आहे. दोघेही एकमेकांना भेटत असतात आणि यावरून दोघे एकमेकांना खूप क्लोज असल्याचे दिसून येते. मात्र दोघांनाही याबाबत छेडले असता दोघांनीही यावर मौन बाळगणे पसंत केले आहे.

अजून तरी दोघांच्या अ’फेयरची अधिकृत घोषणा झाली नसली तरी बरेच जण हे अ’फेयर सुरू असल्याचे गृहीत धरून चालले आहेत. आता यात किती तथ्य आहे, हे आपल्याला सिद्धार्थ किंवा तारा च सांगू शकतात.

तोपर्यंत आमच्या वेबसाइट ला व्हिजिट करत राहा आणि असे अनेक मनोरंजक लेख वाचत राहा. हे लेख तुमच्या मित्रमंडळीत शेअर करायला विसरू नका आणि आठवणीने आमच्या लेखांबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्स मधून कळवत राहा.

You might also like