एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम सिद्धी पाटणेचे होणार लग्न! पती आहे हा मोठा उद्योगपती..

‘गोव्याच्या किनाऱ्याव’ हे गाणं तुम्ही ऐकलं आहे का? आपल्या प्रिय पत्नीला एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला घेऊन जायचं आहे, पण कुठे न्यावं या विचारात असलेला नायक आणि त्याला आपल्याला गोव्याच्या किनाऱ्यावर नेण्याविषयी सुचवणारी नायिका यांची छोटीशी पण गोड गोष्ट या गाण्यातून दाखवण्यात आली आहे.

अर्थातच ही सुंदर प्रेमकथा लोकांच्या मनाला स्पर्शून गेली आणि लोकांच्या ओठी या गाण्याच्या ओळी नाचू लागल्या.

‘गोव्याच्या किनाऱ्याव’ या गाण्याचे बोल आणि त्याची धून याबरोबरच या गाण्यामुळे प्रसिद्ध झाली ती यातली नायिका. या नायिकेचं नाव आहे सिद्धी पाटणे. सिद्धी मूळची खेडची आहे. सध्या मात्र ती मुंबईत असते.

आपल्या गोड लूक्स मुळे सिद्धी लोकप्रिय झाली. या गाण्यातला तिचा अभिनयही उल्लेखनीय आहे. त्यानंतर सिद्धीला ‘सांग तू आहेस का’ ही स्टार प्रवाह वाहिनी वरील मालिका मिळाली. यात तिने वैदेहीच्या मोठ्या बहिणीची म्हणजेच शांभवीची भूमिका निभावली होती. सध्या सिद्धी एका नव्या भूमिकेत दिसून येणार आहे.

सिध्दीची ही नवी भूमिका असणार आहे पत्नीची. सिद्धीची ही भूमिका मात्र कोणत्याही मालिकेतील नसून तिच्या खऱ्या आयुष्यातील आहे. हो, सिद्धी पाटणे लवकरच लग्न करणार आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त एक फोटो सोशल मीडिया वर शेअर करत तिने ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. या फोटोमध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडबरोबर दिसत आहे. तिच्या या बॉयफ्रेंड बरोबरच तिचे लग्न होणार आहे, अशी बातमी तिने चाहत्यांना दिली आहे.

सिद्धीच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे विशाल दलाल. लवकरच सिद्धी विशालसोबत लग्न करणार आहे. आपल्या वाढदिवसाचा केक कापत तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना सोशल मीडिया वरून दिली आहे.

लग्नाच्या आधीचा विधी देखील यावेळी करण्यात आल्याचे सिध्दीने सांगितले. सिद्धी पाटणेचा होणारा पती विशाल दलाल हा खूप मोठा उद्योगपती आहे. विशालचा आर्किटेक्चरचा व्यवसाय आहे असे सांगण्यात आले आहे. त्याची कमाई कोट्यवधी रुपयांत असल्याचेही कळते. सिद्धीच्या विवाहासाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा!

तुमच्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्यातल्या अशा काही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी नियमितपणे आमच्या वेबसाईटला भेट देत राहा. आमचे लेख आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आवडलेले लेख आपल्या मित्रमंडळींबरोबर नक्की शेअर करा.

You might also like