एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अखेर सिद्धार्थच्या मृ’त्यूचं कारण आलं समोर! हार्ट ऍटॅक ने नाही, तर यामुळे झाला मृ’त्यू!

२ सप्टेंबर रोजी अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे नि’ध’न झाले. प्राथमिक अहवालात हा मृ’त्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे, असे कूपर हॉस्पिटलद्वारे सांगण्यात आले आहे. मात्र अजूनही त्याच्या मृ’त्यूबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

सिद्धार्थच्या कुटुंबाकडून किंवा पोलिसांकडून मात्र याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. सखोल चौकशी केल्यानंतरच याबाबत स्टेटमेंट देण्यात येईल, असा तर्क लावला जात आहे.

कमल रशीद खान नंतर आता या प्रकरणी राखी सावंतने तोंड उघडलं आहे. यावर एक व्हिडिओ बनवत तिने आपली मते मांडली आहेत. तसेच तिने काही वक्तव्ये देखील केली आहेत. तिच्या या व्हिडिओ मधील वक्तव्याबरोबरच तिने लावलेला सिंदूर देखील चर्चेचा विषय झाला आहे. आपल्या या व्हिडिओ मध्ये राखी म्हणते, “मी अजून घरीच आहे. मी कुठेही बाहेर पडू शकत नाही.

सिद्धार्थच्या मृ’त्यूने मी खूप हादरले आहे. मला आताच समजले की सिद्धार्थचा मृ’त्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नाहीये. मग तो कशाने झाला? वेगवेगळ्या डॉक्टरनी साडेतीन तास त्याचे पोस्टमार्टम केले. त्या पोस्टमार्टम अहवालात त्यांनी म्हटले आहे की त्याला हृदयविकाराचा झटका आला नाही. तर मग त्याचा मृ’त्यू कसा झाला, हे शोधण्यासाठी बऱ्याच गोष्टी तपासासाठी पाठवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी खूप काळजीत आहे.”

राखीने पुढे म्हटले आहे, की “त्याच्या गाडीच्या काचाही फुटल्या होत्या. तो कुणाशी भां’डला होता का? असं म्हटलं जातं, की तो रात्री ८-८:३० च्या दरम्यान कोणाला तरी भेटायला गेला होता. त्यानंतर तो घरी आला आणि त्याची तब्येत बरी नाही असे सांगितले.

पुन्हा रात्री तीन वाजता त्याने तब्येत बरी नसल्याचे सांगितले. त्याने काही औषधं खाल्ली. ती औषधं कोणती होती? त्याचं बिल्डींग मध्ये कोणाशी भां’ड’ण झालं होतं का? सत्य काय आहे, हे आपल्यासमोर, त्याच्या चाहत्यांसमोर आलेच पाहिजे.”

तिच्या या व्हिडिओ वर अनेक कमेंट्स आल्या आहेत. काही लोक राखीच्या मताशी सहमती दर्शवत आहेत, तर काही लोक मात्र तिला ड्रामेबाज म्हणत आहेत. काही जण म्हणत आहेत, की राखी हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहे. त्यांचे म्हणणे आहे, की राखीच्या शब्दांमध्ये किती सत्य आहे, याची खात्री देता येत नाही. जोपर्यंत पोलीस किंवा खुद्द सिद्धार्थच्या घरच्यांकडून अधिकृत स्टेटमेंट दिले जात नाही, तोपर्यंत कोणत्याच गोष्टींवर विश्वास ठेवणे सध्यातरी शक्य नाही.

You might also like