एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अचानक नि’ध’न झालेल्या सिद्धार्थ शुक्ला बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

टीव्ही स्टार सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर रोजी हृद’यवि’काराच्या तीव्र झटक्याने नि’ध’न झाले. १२ डिसेंबर १९८० रोजी जन्मलेला सिद्धार्थ केवळ ४० वर्षांचा होता. त्याच्या जाण्याने देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुटुंब, शिक्षण: सिद्धार्थ मूळचा मुंबईचा होता. त्याचे वडील अशोक शुक्ला सिव्हिल इंजिनीयर होते. त्याची आई रिटा शुक्ला हाऊसवाईफ आहे. त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत. सिद्धार्थचे शालेय शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूल मधून झाले आहे. त्याने रचना संसद स्कूल मधून इंटेरियर डिझाईनिंग मध्ये पदवी घेतली असून काही वर्षे इंटेरियर डिझायनर म्हणून कामही केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

मॉडेलिंग: २००४ मध्ये ‘ग्लॅडरॅग्स मॅनहंट अँड मेगामॉडेल कॉन्टेस्ट’ मध्ये भाग घेत द्वितीय स्थान पटकावले होते. २००५ मध्ये टर्की मध्ये झालेल्या ‘वर्ल्डस् बेस्ट मॉडेल कॉन्टेस्ट’ मध्ये भाग घेत त्याने आशिया, लॅटीन अमेरिका आणि युरोप मधील ४० स्पर्धकांना हरवून विजेतेपद जिंकले होते. असा किताब जिंकणारा तो पहिला भारतीय तसेच पहिला आशियाई मॉडेल ठरला. बजाज अव्हेंजर, आयसीआयसीआय या ब्रँड्स च्या जाहिरातींमध्ये त्याने काम केले आहे.

अभिनय: २००८ मध्ये सिद्धार्थने सोनी टीव्ही वरील ‘बाबूल का आंगन छूटे ना’ मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. जाने पहचाने से..ये अजनबी (२००९), लव्ह यू जिंदगी (२०११), दिल से दिल तक (२०१७) या मालिकांमध्येही त्याने काम केले आहे. ‘आहट’ आणि ‘सीआयडी’ च्या काही भागांमध्ये देखील त्याने काम केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

प्रसिद्धी: सिद्धार्थला खरी प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या कलर्स टीव्ही वाहिनी वरील ‘बालिका वधू’ (२०१२) मालिकेमधील शिवराज शेखर या व्यक्तिरेखेने. त्याने ‘झलक दिखला जा ६’ या डान्स रिऍलिटी शो मध्येही भाग घेतला होता. २०१४ मध्ये त्याने ‘हमटी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यात त्याने अंगद बेदी या एनआरआय डॉक्टरची भूमिका केली होती ज्यासाठी त्याला ‘ब्रेकथ्रू सपोर्टींग परफॉर्मन्स’ हा पुरस्कारही मिळाला.

सावधान इंडिया, इंडियाज् गॉट टॅलेंट ६ व ७ यांसारख्या कार्यक्रमांचे त्याने सूत्रसंचालन केले होते. ‘फिअर फॅक्टर- खतरों के खिलाडी ७’ (२०१६) आणि ‘बिग बॉस १३’ (२०१९) या दोन रिऍलिटी शो चा तो विजेता आहे. ‘ब्रोकन बट ब्युटीफुल ३’ द्वारे त्याने ओटीटी प्लॅटफॉर्म वर पदार्पण केले. विशेष म्हणजे २०१४ मध्ये त्याला ‘मोस्ट फिट ऍक्टर’ चा अवॉर्ड मिळाला होता.

You might also like