एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

धक्कादायक! बिग बॉस १३ विजेता या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, वयाच्या ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

बॉलिवूड इंडस्ट्री मधून अत्यंत दु: खद बातमी समोर आली आहे. सिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले आहे. सिद्धार्थ शुक्ला फक्त ४० वर्षांचे होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना आज मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई पोलिसांनी त्याच्या मृत्यूची अधिकृत माहिती दिली आहे. त्याचा मृतदेह पोस्टमार्टमनासाठी ठेवण्यात आला आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने टीव्ही सीरियल बालिका वुध मधून लोकप्रियता मिळाली. दुःखाची गोष्ट म्हणजे या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आता या मालिकेचे हे दोन मोठे तारे आपल्यात नाहीत.

२००८ मध्ये सिद्धार्थ शुक्ला ने सीरीयल बाबुल का अंगना छूट ना या मालिकेमध्ये काम केले होते. बालिका वुध सीरीयल पासून प्रसिद्ध झाल्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. नंतर तो वो दिल से दिल तक या मालिकेत दिसला. आणि नंतर हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

ही बातमी मिळाल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमधून दुःख व्यक्त केले जात आहे. अगदी लहान वयात जग सोडून गेलेल्या सुशांत सिंह राजपूतच्या दुःखातून लोक अजून सावरू शकले नाहीत, की आज सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या बातमीने देश शोकात बुडाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

बिग बॉस १३ शो मधून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलसोबत त्याची जोडी चांगलीच पसंत झाली. दोघेही अलीकडेच बिग बॉस OTT मध्ये दिसले होते.

याशिवाय सिद्धार्थ शुक्ला फियर फॅक्टर-खतरों के खिलाडी सीझन ७ मध्ये दिसला होता. त्यांनी सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंटचेही आयोजन केले होते.

सिद्धार्थ शुक्लाचा जन्म १२ डिसेंबर १९८० रोजी मुंबईतील एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. मॉडेलिंगच्या काळात त्याने वडिलांना गमावले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

सिद्धार्थ शुक्ला शेवटच्या दिवसापर्यंत सतत काम करत होता. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याने एका लहान मुलीसोबतचा त्याचा फोटो शेअर केला होता, जो चांगलाच लोकांना आवडला होता. आतापर्यंत चाहते हा विश्वास ठेवण्यास तयार नाहीत की हा अभिनेता आता आपल्यात नाही.

You might also like