एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बंधू मामांचा मुलगा कोण आहे माहीत आहे का? तो देखील आहे एक अभिनेता..

झी मराठी वाहिनीवर अनेक मालिका सुरू आहेत. त्यांचे विषय देखील वेगवेगळे आहेत. यातलीच एक मालिका म्हणजे ‘माझा होशील ना’. या मालिकेतल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहेत. यातलेच एक पात्र म्हणजे बंधू मामा. ही व्यक्तिरेखा साकारली आहे ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांनी. सुनील तावडे गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्री मध्ये कार्यरत आहेत. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

सुनील तावडे यांनी जबरदस्त, मलाल, शोध, रेडीमिक्स, मेमरी कार्ड, आयपीएल- इंडियन प्रेमाचा लफडा, फ्रेंडशिप डॉट कॉम, महागुरू, गोलमाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. ‘काळे धंदे’ सारख्या वेब सिरीज मध्ये देखील त्यांनी काम कमला हे. झी मराठी वरील फू बाई फू या कार्यक्रमातून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावलं. चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची जादू ते दाखवत आहेत. गंभीर असो वा विनोदी, प्रत्येक भूमिका ते अत्यंत मन लावून करतात.

तुम्हाला माहीत आहे का, अशा या लोकप्रिय अभिनेत्याचा मुलगाही वडीलांच्या पावलावर पाऊल टाकून चित्रपटसृष्टीत आला आहे? हो, सुनील तावडे यांचा मुलगाही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करतो. त्याचे नाव आहे शुभंकर तावडे. २६ ऑक्टोबर १९९४ रोजी शुभंकरचा जन्म कांदिवली येथे झाला. शुभंकरला आपण झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ या मालिकेत सर्वप्रथम पाहिले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shubhankar Tawde (@shubhankar_tawde)

आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात शुभंकरने ‘डबल सीट’ या चित्रपटातून केली. ‘कागर’ या चित्रपटात तो अभिनेत्री रिंकू राजगुरू बरोबर प्रमुख भूमिकेत दिसला होता. त्याने ‘काळे धंदे’ या वेब सिरीज मध्येही काम केले आहे. ‘काळे धंदे’ मध्ये आपल्याला तावडे बाप-लेकाची अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळते. आपल्या वडीलांप्रमाणेच शुभंकरला गंभीर आणि विनोदी भूमिका निभावण्याची जाण आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shubhankar Tawde (@shubhankar_tawde)

शुभंकरचे शिक्षण मुंबईमध्येच झाले आहे. तो मुंबईच्या रुईया कॉलेजचा विद्यार्थी आहे. मुंबईच्या ड्रामास्कूल मधून त्याने आपला अभिनय आणि फिल्ममेकींग चा कोर्स पूर्ण केला आहे. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये कामे केली आहेत. कॉलेज मध्ये असताना त्याने अनेक सांस्कृतिक कर्यक्रमांमध्ये भाग घेत आपला अभिनयातला अनुभव वाढवला.

काय मग मंडळी, कशी वाटली ही वडील-मुलाची जोडी? अशा अनेक जोड्या मराठी इंडस्ट्री मध्ये कार्यरत आहेत. तुम्हाला यांपैकी कोणत्या जोड्या माहीत आहेत? आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा.

You might also like