एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील स्वीटू ची काकी खऱ्या आयुष्यात अशी दिसते! पाहा सुमन काकीचे ग्लॅमरस फोटो..

झी मराठी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सध्या खूप गाजते आहे. या मालिकेतल्या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत. स्वीटू आणि ओम ची लव्ह स्टोरी लोकांना खूपच आवडू लागली आहे. या दोघांच्या प्रेमाबद्दल दोघांच्याही घरी समजले आहे. मात्र स्वीटूच्या घरून या लग्नाला विरोध होत आहे. आता हा विरोध स्वीटू आणि ओम होकारात कसा बदलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

स्वीटूचे पात्र हे खूपच समजूतदार आहे आणि ती इतरांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेते. त्यामुळेच ही व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली आहे. मालिका आता एका नव्या वळणावर येऊन थांबली आहे.

स्वीटू आता आपल्या करिअरचा गंभीरपणे विचार करताना दिसत आहे. त्यासाठी ती आता एका ब्युटी पार्लर मध्ये काम करणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. ती जिथे काम करणार आहे, त्या पार्लरची मालकीण स्वीटूसाठी एक स्थळ आणणार आहे. त्यामुळे या नवीन स्थळाची एन्ट्री मालिकेत कोणते नवे ट्विस्ट आणणार आहे, हे बघणे खरंच मनोरंजक ठरणार आहे.

स्वीटू आणि ओम च्या नात्याला स्वीटूच्या सुमन काकीचे मात्र पूर्ण समर्थन आहे. या दोघांना काकी नेहमी खंबीरपणे पाठींबा देताना दिसते. या काकीची म्हणजेच सुमन साळवी ची भूमिका निभावली आहे शुभांगी भुजबळ या अभिनेत्रीने. मालिकेतल्या तिच्या धाडसीपणाचे सर्वांनीच कौतुक केले आहे. या मालिकेत काम करण्यापूर्वी तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shubhangi Bhujbal (@bhujbal_shubhangi)

तिचा ‘भिकारी’ (२०१७) हा चित्रपट प्रचंड गाजला. तिने २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटातदेखील काम केले होते. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वाघी’ या चित्रपटात तिने अत्यंत दर्जेदारपणे तिची भूमिका निभावली होती.

शुभांगीने नुकतेच इंस्टाग्राम वर आपले फोटो शेअर केले. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत अत्यंत साधी दिसणारी व्यक्तिरेखा साकारणारी ही अभिनेत्री इंस्टाग्राम वरील फोटोंमध्ये मात्र खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

ती या फोटोंमध्ये खूपच सुरेख आणि सुंदर दिसते आहे. तिने घातलेला ड्रेस तिला अत्यंत खुलून दिसतो आहे. प्रेक्षकांनी तिच्या या लूक चे तोंडभरून कौतुक केले आहे. शुभांगी सोशल मीडिया द्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंना खूप सारे लाईक्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करणाऱ्या कमेंट्स ही केल्या आहेत.

You might also like