एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल इतकी सुंदर आहे श्रेयस तळपदेची पत्नी! वाचा त्यांची प्रेमकहाणी…

सध्या झी मराठी वाहिनी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेची प्रचंड चर्चा सुरू आहे. अभिनेता श्रेयस तळपदे तब्बल १७ वर्षांनी तर अभिनेत्री प्रार्थना बेहरे १० वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. प्रेक्षकांना या मालिकेची खूप उत्सुकता लागून राहिली आहे. मराठी मालिका आणि चित्रपट यांमध्ये यश मिळवल्यावर श्रेयसने हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका निभावल्या आहेत.

ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकून घेतलं सारं… ही कोणत्याही चित्रपटाची कथा नसून ही आहे एका अभिनेत्याची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथा. ही प्रेमकहाणी आहे श्रेयस तळपदेची. ‘देखा जो तुझे यार, दिल में बजी गिटार’ असं काहीसं श्रेयसच्या बाबतीत झालं. दीप्तीला पाहताक्षणीच श्रेयसला दीप्तीसोबत पहली नजर का प्यार झाला. तेच घडलं दीप्तीच्या बाबतीतही. कशी आहे नक्की या दोघांची लव्ह स्टोरी?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepti Shreyas Talpade (@deeptitalpade)

एका कॉलेज मधील कार्यक्रमासाठी श्रेयस तळपदेला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी पहिल्यांदा श्रेयसने दीप्तीला पाहिलं. पाहताक्षणी श्रेयसला दीप्ती आवडून गेली आणि दीप्तीला श्रेयसचा साधेपणा खूप भावला. दीप्ती दिसायला खूपच सुंदर आहे. दोघांचे प्रेम खुलू लागले. दीप्ती सायकॉलॉजी मध्ये शिक्षण घेत होती. तिचे शिक्षण पूर्ण होताच तिच्या घरी श्रेयस आणि तिच्या नात्याबद्दल सांगण्यात आले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepti Shreyas Talpade (@deeptitalpade)

घरच्यांनी फारसे आढेवेढे न घेता लग्नाची तारीख ठरवली. दीप्तीच्या मावशीचे मंगल कार्यालय आहे. लग्न तेथेच करायचे अशी जरी मावशीची इच्छा असली तरी फक्त ३१ डिसेंबरची तारीख शिल्लक होती. मग काय, २००४ सालाला निरोप देत यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली. दीप्ती पेशाने मानसोपचारतज्ज्ञ आहे, तर श्रेयस अभिनेता. वेगवेगळ्या पेशात असूनही गेली १५ वर्षे दोघांनी एकमेकांची चांगली साथ निभावली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepti Shreyas Talpade (@deeptitalpade)

दीप्ती खंबीरपणे श्रेयसच्या पाठीशी उभी असते, त्याच्या प्रत्येक निर्णयात त्याच्या बरोबर असते. श्रेयस देखील आपल्या यशाचे श्रेय दीप्तीला देत आला आहे. करिअरचाय सुरुवातीला दीप्तीने आपल्यावरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही, असे श्रेयस सांगतो.

आयुष्यात जे काही यश पाहायला मिळाले आहे, ते दीप्ती पाठीशी असल्यानेच, असे श्रेयस अभिमानाने सांगतो. दोघांमध्ये कितीही भांडण झालं तरी काही क्षणात ते विसरतो, असे दीप्ती सांगते. दोघांमध्ये कितीही कडाक्याचं भां’ड’ण झालं तरी सकाळ नेहमी गोड बोलूनच होते आणि तीच यांच्या यशस्वी नात्याची गुरूकिल्ली असल्याचेही दीप्तीने सांगितले.

You might also like