एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेयाची हटके लव्ह स्टोरी! तिचा पतीदेखील आहे याच क्षेत्रातला..

झी मराठी वाहिनी वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने संबंध महाराष्ट्राला वेड लावले. यातले कलाकार आपल्या कॉमेडी टायमिंग मुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात यशस्वी झाले. या कार्यक्रमातल्या प्रत्येक कलाकाराला प्रत्येक मराठी माणूस ओळखतो. यामध्ये विशेष कौतुक करावं लागेल ते श्रेया बुगडेचं.

पहिल्यापासूनच या कार्यक्रमातली एकमेव महिला कलाकार राहिलेली श्रेया इतर कलाकारांच्या तुलनेत कुठेच मागे पडताना दिसत नाही. सगळ्यांच्या तोडीस तोड स्किट करत श्रेया या कार्यक्रमात जान आणते.

जसे कार्यक्रमातील प्रत्येक भागात श्रेया काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करते, तसेच काहीसे तिच्या लग्नाच्या बाबतीतही झाले आहे असे म्हणावे लागेल. २७ डिसेंबर २०१५ ला श्रेयाचं लग्न झालं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

पण या लग्नामागे देखील एक लंबी लव्ह स्टोरी आहे बरं का मंडळी! आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की श्रेया बुगडेचे लग्न निखिल सेठ बरोबर झाले आहे. श्रेया मराठी, तर निखिल गुजराती कुटुंबातील आहे.

एका मालिकेच्या शूटींग दरम्यान श्रेया आणि निखिलची भेट झाली. निखिल सतत श्रेयाशी काही ना काही निमित्ताने भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत असे. भेटीचे रूपांतर ओळखीत झाले. ओळखीचे रूपांतर.. थांबा! इथे मात्र एक ट्विस्ट आहे.

निखिल सेटवर नेहमी श्रेयाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असे. मात्र काही कारणाने दोघांमध्ये काहीतरी बिनसलं. त्यातून वा’द झाले आणि दोघे एकमेकांपासून दूर झाले. 

त्यांच्यातला हा दुरावा मात्र फार काळ टिकू शकला नाही. श्रेयाने एका गाजलेल्या मराठी मालिकेमधील क्रेडीट लाईन मध्ये जेव्हा कार्यकारी निर्माता म्हणून निखिलचे नाव पाहिले, तेव्हा त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याला फोन केला. दोघांमधला संवाद पुन्हा सुरळीत झाला. दरम्यान निखिलच्या घरी त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती.

निखिलने लागलीच श्रेयाला ‘तू सिंगल आहेस का’ असे विचारले. ‘हो’ असे उत्तर आल्यावर जराही वेळ न दवडता निखिलने श्रेयाला लग्नाची मागणी घातली. आश्चर्य म्हणजे श्रेयानेही लगेच आपला होकार कळवून टाकला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

कुटुंबियांच्या सहमतीने हे लग्न जमले आणि अखेरीस श्रेया आणि निखिल लग्नबंधनात अडकले. निखिलसाठी हे पहिल्या नजरेतले प्रेम असले तरी श्रेयाची गोष्ट वेगळी होती. आता मात्र राजा-राणीचा संसार सुखाने सुरू आहे. काय मग मित्रांनो, कशी वाटली ही फिल्म सारखी असलेली रिअल लाईफ लव्ह स्टोरी? आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा.

You might also like