एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेचे घर आहे खूपच सुंदर! पाहा तिच्या या आलिशान घराचे फोटो..

झी मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. यातला प्रत्येक कलाकार लोकांना आपलासा वाटतो. या कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दलही लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता दिसून येते. या कार्यक्रमातली एक महत्त्वाची कलाकार आहे श्रेया बुगडे. आपल्या विनोदाच्या टायमिंगने आणि वेगवेगळ्या अभिनेत्रींच्या मिमिक्रीने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

श्रेया सोशल मीडिया वर बरीच सक्रिय असते. डिसेंबर २०१५ मध्ये निखिल सेठ बरोबर लग्न झाल्यानंतर ती तिच्या स्वतःच्या घरी राहायला गेली. श्रेया स्वतःच्या फोटोंबरोबरच आपल्या घराचेही फोटो सोशल मीडिया वर शेअर करत असते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

/p>

हे बघितले असता लक्षात येईल की श्रेयाचे घर तिच्यासारखेच सुंदर आहे. तिच्या प्रशस्त घराचे फोटो ती नेहमी खूप आपुलकीने शेअर करताना दिसते. तिच्याप्रमाणेच प्रेक्षक तिच्या घराचेही चाहते झाले आहेत. श्रेयाला वाचनाची आवड असल्याने ती बऱ्याचदा तिच्या प्रशस्त घरात आरामात पुस्तक वाचतानाचे फोटो देखील आपल्याला तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर पाहायला मिळतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

श्रेयाच्या घरातील किचन, बेडरूम, डायनिंग रूम आणि हॉल चे फोटो बघता कुणीही त्याच्या इंटेरियरचा अंदाज लावू शकतो. हे फोटो बघताना लक्षात येते की या घरच्या इंटेरियर वर खूप मेहनत घेण्यात आली आहे. घराचे डिझाईन डोळ्यांत भरण्यासारखे आहे.

या डिझाईनला साजेशी घराची सजावट आहे. घरातील प्रत्येक वस्तू वर विशेष मेहनत घेतल्याचे दिसते. कारण ही प्रत्येक वस्तू घराच्या डिझाईनला शोभेल अशीच आहे.

विशेष कौतुक करावं लागेल ते श्रेयाच्या घराच्या बाल्कनीचं. निसर्गाशी जवळीक साधत हितगुज करणारी ही बाल्कनी बघता क्षणी मनाला शांती देऊन जाते. या प्रशस्त बाल्कनीमध्ये एक आरामदायी झोपाळा आणि बरीच झाडे आहेत. दिवसभराचा थकवा घालवायचं हक्काचं ठिकाण असावं तशी ही बाल्कनी आहे. एकूणच श्रेयाने तिच्या स्वप्नातलं हे घर सजवण्यासाठी खूपच मेहनत घेतलेली दिसून येते.

आपल्या आवडीचा दिलदार जोडीदार आणि शानदार घर या गोष्टी एकत्रितपणे फार कमी जणांच्या नशिबी असतात. श्रेयाच्या आयुष्यात या दोन्ही गोष्टी आहेत, ही गोष्ट खरंच आनंददायक आहे. तिचे चाहते तिला नेहमीच प्रोत्साहन देताना दिसतात.

श्रेया जेवढी मेहनत आपल्या कामासाठी करते, तेवढीच तिच्या घरासाठी देखील करते. तिच्या फोटोंवरून ही गोष्ट सहज कळून येते. काय मग मंडळी, तुम्हालाही आवडलं ना श्रेयाचं घर? आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा.

You might also like