एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘स्वतःची ओळख पुसण्याचं काम’; बिग बॉस मधील सहभागामुळे शिवलीला समर्थक नाराज..

कोणताही स्पर्धक ‘बिग बॉस’ मध्ये सहभागी होणार म्हटल्यावर त्यांचे चाहते त्यांना जिंकून देण्यासाठी अगदी कंबर कसून कामाला लागतात. अशा स्पर्धकांना चाहत्यांचा नेहमीच पाठींबा राहिला आहे. यंदा मात्र एका स्पर्धकाच्या बाबतीत हे चित्र थोडं उलटं पाहायला मिळतंय. सध्या टीव्ही वर ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ ची धूम पाहायला मिळत आहे. मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींबरोबर काही सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्वं देखील यंदाच्या पर्वात पाहायला मिळत आहेत. त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे शिवलीला पाटील.

कीर्तनकार असलेल्या शिवलीला पाटीलला घरातूनदेखील बिग बॉस मध्ये सहभागी होण्यास वि’रोध होता. मात्र त्यांचा विरो’ध डावलून आणि स्वतःवर विश्वास ठेवून शिवलीलाने बिग बॉस च्या घरात पाऊल ठेवले आहे. मात्र तिचा हा निर्णय तिच्या समर्थकांना आवडला नाहीये. तिच्या समर्थकांनी सोशल मीडिया वर आपला रो’ष नोंदवायला सुरवात केली आहे. सोशल मीडिया च्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वर शिवलीला समर्थकांनी आपली मतं मंडळी आहेत. मात्र यातील बरीचशी मतं ही शिवलीलाच्या ‘बिग बॉस’ मध्ये सहभागी होण्याच्या वि’रो’धात आहेत.

शिवलीला मूळची सोलापूरच्या बार्शी गावची आहे. तिच्या घरात सगळेच सांप्रदायिक आहेत. तिचे वडील देखील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. शिवलीला केवळ पाच वर्षांची असल्यापासून कीर्तन करत आहे. आपल्या कीर्तनाद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाजप्रबोधन करत फिरणाऱ्या शिवलीला पाटीलने एक कीर्तनकार म्हणून बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. आजपर्यंत तिने जवळपास एक हजार पेक्षा जास्त कीर्तने केली आहेत.

हजारो लोकांसमोर कीर्तन करणाऱ्या शिवलीलाला बिग बॉस च्या घरात टास्क पूर्ण करताना पाहून तिच्या समर्थकांना वाईट वाटले आहे. नेटकाऱ्यांनीही तिला यावरून ट्रोल करायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस यामध्ये जायची काय गरज होती?’, ‘तुम्हाला हे शोभत नाही, तुम्ही खूप जणांचा आदर्श आहात’, ‘स्वतःची ओळख पुसण्याचं काम करेल हे बिग बॉस’, ‘लोकांना परमार्थाची शिकवण देणारे तुम्ही लोकांना फालतू ड्रामा बघण्यासाठी प्रोत्साहित करणार हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे’ अशा कमेंट्स मधून शिवलीला समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

‘ताई तुमचा निर्णय चुकीचा ठरेल’, ‘समाजाला तुमची गरज आहे, बिग बॉसला नाही’ अशा कमेंट्स देखील अनेक नेटकऱ्यांनी केलेल्या पाहायला मिळाल्या. नुकत्याच झालेल्या एक भागात ‘इतर स्पर्धकांशी कसं वागावं हे कळत नाही’ असं म्हणत शिवलीला रडली होती. कलर्स मराठी वाहिनी वर प्रसारित होणाऱ्या या रिऍलिटी शो मध्ये आता अजून काय काय घडणार हे येणाऱ्या भागांमध्ये कळेलच.

You might also like