एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

एखाद्या गॅरेज मध्ये काम करणारा व्यक्ती असा बनला १८० कोटी रू.कंपनीचा मालक..जाणून घ्या शिवकुमार बोराडे यांच्या बद्दल..

सुरूवातीच्या आयुष्यामध्ये हलाखीच्या परिस्थितीत अक्षरशः गॅरेजमध्ये काम करून त्यांनी आपले दिवस काढले. आणि आज हीच व्यक्ती चक्क १८० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. ही व्यक्ती म्हणजे ‘WHR’ कंपनीचे संस्थापक किशोर बोराडे होय. गरिबीतुन चालु झालेला प्रवास आज श्रीमंतीच्या वाटेवर आहे. यांचा हा प्रवास खरंच वाखाणण्याजोगा आहे.

शिवकुमार बोराडे हे एक यशस्वी उद्योजक बनले आहेत. त्यांनी आजच्या समाजातील तरूणाईसमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे. या उद्योजकांनी त्यांचा सामान्य व्यक्तीपासून ते एका यशस्वी उद्योजकापर्यंतचा प्रवास अनेक खडतर अडचणींवर मात करत केला आहे. सुरूवातीला महिना केवळ ५० रू. कमावणारे शिवकुमार आज करोडोंची उलाढाल करताना पाहायला मिळत आहेत.

वैद्यकीय मार्केटिंग क्षेत्रात राहून समाजसेवा हे कार्यक्षेत्र मानणारे आणि. समाजातल्या तळागाळातील लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा आणि त्याची माहिती पुरविणारे बोराडे यशाचे धनी बनले आहेत. पंढरपूर तालुक्यातील भोसी हे त्यांचे गाव.

हलाखीची परिस्थिती असल्यामुळं शिक्षण अर्धवट झालं आणि पुढे त्यांनी गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. पण आपला मुलगा शासकीय सेवेत रूजू झाला पाहिजे या वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी मुक्त विद्यापीठातुन बी. ए. पदवी पुर्ण केली.

शिवकुमार बोराडे यांना सुरूवातीपासूनच समाजकार्य करण्याची प्रचंड इच्छा होती. २००७ साली “सीआयपीएफ” या शासकीय सेवेत ते रूजू झाले. पण तिथे मन न लागल्याने आणि समाजासाठी काहीतरी करण्याचे ध्येय शांत बसु न देत असल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली.

नंतर एका व्हॅन मधून त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. नंतर तर “आयसीआयसीआय” मध्ये बिझनेस पार्टनर म्हणून देखील काही काळ काम केले.

मात्र समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची अजूनही धडपड चालुच होती. अशातच त्यांनी वैद्यकीय सेवेमधील ‘Liveworld Health Tech Pvt. Ltd.’ या कंपनीची स्थापना केली.

या कंपनीद्वारे गरजुंना वैद्यकीय सेवा आणि माहिती पुरविण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. महत्त्वाचे म्हणजे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. शिवाय रूग्णांना खात्रीशीर उपचार पुरवण्याचे १००% यशस्वी कार्य केले.

सुरूवातीला पुण्याच्या भाड्याच्या दोन खोल्यातून सुरू झालेलं हे ‘WHR’ च कार्य आज केवळ पुणेच न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहे. आज कित्येक रूग्णांना शिवकुमार यांच्या कंपनीद्वारे योग्य आणि खात्रीशीर उपचार मिळत आहे. या साआन रूग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुललेले आहे. एका क्लिकवर योग्य डाॅक्टर आणि अचूक उपचार देण्याचं काम ‘WHR’ करत आहे.

वारजेसारख्या महागड्या भागात ही कंपनी त्यांनी उभी केली आहे. ‘WHR’ ही फर्म माहारातील अव्वल फर्म ठरत आहे. शहरापुरतेच मर्यादित न राहता ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचा आणि रूग्णांना वाजवी दरामध्ये उपचार देण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन ही कंपनी आज मोठ्या उत्साहाने काम करत आहे.
कोणत्याही प्रकारचे मार्केटिंग चे शिक्षण न घेता केवळ जिद्द, चिकाटी आणि धाडस या बळावर शिवकुमार बोराडे यांनी हे करून दाखवले आहे.

भारतामधल्या वैद्यकीय क्षेत्राला डिजिटल करण्याच्या उद्देशाने खेडेगावातील हे यशस्वी उद्योजक अहोरात्र मेहनत करताहेत. आजपर्यंत त्यांनी स्वतःबरोबरच समाजाचाही विकास घडवून आणल्याचे दिसून येते. अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात, डगमगून न जाता शिवकुमार बोराडे यांनी ‘WHR’ या संस्थेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. येत्या काळात त्यापेक्षाही उत्तुंग भरारी ‘WHR’ निश्चितच मारेल यात शंका नाही!

You might also like