एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज?’ शिवानी बावकर लवकरच नव्या भूमिकेत…

'लागीर झालं जी' फेम शीतल लवकर नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या छोट्या पडद्यावर नवीन मालिकांची लाटच आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नवीन कथानक आणि नवीन चेहरे यांची मेजवानी बघायला मिळणार आहे. या नवीन मालिकांसाठी प्रेक्षक आवर्जून वेळ काढतील यात शंकाच नाही. काही गाजलेले चेहरे या नव्या मालिकांच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे या कलाकारांच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे.

अशीच एक नवीन मालिका सोनी मराठी टीव्ही वर लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येणार आहे. या मालिकेचं नाव आहे ‘कुसुम’. ही मालिका सोनी हिंदी वाहिनी वरील ‘कुसुम’ मालिकेचा रिमेक असणार आहे. प्रसिद्ध निर्माती एकता कपूर या मालिकेची निर्मिती करणार आहे. प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी ही आहे, की या मालिकेद्वारे अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar)

/p>

सासर जोडण्यासाठी माहेर तोडण्याची गरज नसते हा संदेश घेऊन ही नवी मालिका छोट्या पडद्यावर साकार होत आहे. आपली नोकरी सांभाळत या मालिकेची नायिका आपल्या सासरच्या घराबरोबरच माहेरचीही जबाबदारी घेताना दिसणार आहे. मुलीचं लग्न झालं की सासर हेच तिचं घर, असा एक साधारण समज आहे. मात्र हाच समज मोडीत काढत कुसुम आपलं सासर आणि माहेर दोन्ही सांभाळताना दिसणार आहे.

शिवानी बावकरने झी मराठी वाहिनी वरील ‘लागीरं झालं जी’ (२०१७) या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या मालिकेतील तिची शीतलीची भूमिका खूपच गाजली होती. आपल्या अभिनय कौशल्याने शिवानीने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar)

तिची आणि अभिनेता नितीश चव्हाणची या मालिकेतील जोडी प्रेक्षकांना खूप भावली होती. शिवानीने अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर च्या ‘मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड मीडिया’ या संस्थेतून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील प्रमुख अभिनेता नितीश चव्हाण देखील याच ऍक्टिंग स्कूलचा विद्यार्थी आहे.

शिवानीने ‘लागीरं झालं जी’ नंतर ‘अलटी पलटी सुमडीत कलटी’ या मालिकेत देखील काम केले होते. मात्र ही मालिका फारशी चालली नव्हती. त्यानंतर तिने २०१७ मध्ये ‘उंडगा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. २०१९ मध्ये तिला ‘युथ ट्यूब’ नावाच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ‘कुसुम’ या नव्या मालिकेत शिवानी बावकर बरोबर अभिनेत्री आरती मोरे देखील असणार आहे.

You might also like