एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘लागीर झालं जी’ फेम शितलीची वाजणार ‘लग्नाची पिपाणी’ लवकरच, शिवानी बावकर पुन्हा सोशल मीडियावर वर चर्चेत..

हल्ली बॉलिवूड दुनियापेक्षाही वरचढ मराठी सिनेश्रुष्टि बनत चालीये, आजकाल बॉलिवूड मधले खूप मोठे डायरेक्टर मराठी सिने कलाकारांना घेऊन काम करू पाहतायेत. बॉलिवूड अभिनेत्यान सारख मराठी अभिनेत्याना सुद्धा मार्केट आलेला आहे. मराठी मध्ये हल्ली खूप चर्चेचे विषय ठरणारे किस्से घडतायेत.

काही दिवसांनपूर्वी ‘झी मराठी’ वर सुरू झालेली सिरियल ‘लगिर झाला जी’ हिने सगळ्यांनाच्या मनात घर केलं, अजय आणि शितल ही जोडी सर्वाना आवडली. त्यामुळे मालिकेचा टीआरपी खूप वाढला गेला, पण काही दिवसांनपूर्वीच या मालिकेने सगळ्यांनाच नि-रोप घेतला आहे. पण त्यातील कलाकार आज सुद्धा खूप चर्चेत असतात, लगिर झालं जी मुळे अभिनेत्री शिवानी बावकरला चांगलाच फेम मिळाला आहे तिला चाहते खूप पसंद करू लागलेत ती आजकाल सोशल मीडियावर पण खूप सक्रिय असते, त्यातून ती आपले हटके फोटोस पोस्ट करत सतत चर्चेत राहते.

अलिकडेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर नवीन फोटो पोस्ट केला आहे, त्या फोटोला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यात पोस्ट मध्ये शिवानी म्हणते की लवकरच तिची ‘लग्नाची पिपाणी वाजणार आहे’.

आत्तापर्यंत मराठी मध्ये खूप सारे अशे गाणे बनलेत की त्यांनी सगळ्यांवर राज केलं त्यात आत्ता एक नवीन गाण्याची भर! मधुर मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या “लग्नाची पिपाणी” हे म्युझिक विडिओ गाणं लवकरच सप्तसुरच्या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित होणार असून चाहते त्याची खूप वाट पाहत आहेत. या गाण्यात एक नवीन जोडी पाहायला मिळणार आहे, सचिन कांबळे आणि शिवानी बावकर ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ह्या म्युझिक विडिओची निर्मिती सुधाकर फाळके आणि प्रकाश फाळके यांनी केलं आहे तर या गाण्याचा दिग्दर्शन प्रकाश फाळके यांनी केलं असून दिनकर खाडे यांचं गीत मधुर मिलिंद शिंदे यांनी संगीतबद्ध करून गायलं आहे. सचिन कांबळे यांनी गाण्यातील नृत्याचे दिग्दर्शन केले आहे तर छायांकन सुनील गुरव यांनी केलं आहे.

ह्या गाण्याचं शूटिंग प्रामुख्याने अलिबाग आणि जुन्नर या ठिकाणी पार पडलं आहे लॉकडाउन पडल्यापासून लग्नाच्या शहणाई खूप वाजू लागली आहे, कारण या लॉकडाउन मुळे सगळ्यांचा लग्न खर्च कमी झाला आणि लग्न देखील पार पाडलं, ह्या अश्या सिजन मध्ये लग्नाची शहणाई खूप वाजू लागलीये म्हणून “लग्नाची पिपाणी” हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like