एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

शिल्पा शेट्टीचा बहिणीसाठी खास मेसेज! मेसेज बघून शमिताला कोसळले रडू..

वूट वर सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ ची हवा आहे. हा कार्यक्रम सुरू होऊन जेमतेम दोन आठवडे झाले आहेत. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेलिब्रेटींनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. अशातच अभिनेत्री हिना खानने रविवारी शो मध्ये हजेरी लावली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा ध’क्का दिला. यावेळी तिने आपल्याबरोबर काही खास गिफ्ट्स सुद्धा आणले होते.

‘बिग बॉस ओटीटी’ हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा अभिनेत्री शमिता शेट्टीला या कार्यक्रमात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. शमिता शेट्टीची बहीण प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी चा पती उद्योगपती राज कुंद्राला पो’र्नोग्रा’फी प्रकरणात अ’ट’क झाल्याने शमिताला लगेच कार्यक्रमात पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली.

शमिता आणि शिल्पा या दोघी बहिणी एकमेकींच्या खूप जवळच्या आहेत, हे तर जगजाहीर आहे. शिल्पावर इतके मोठे सं’क’ट कोसळलेले असताना शमिताने ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये भाग घेतल्याने अनेकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशा वेळी आपण केवळ या कार्यक्रमासाठी कमिटमेन्ट दिल्याने हा कार्यक्रम करत असल्याचे शमिताने स्पष्ट केले.

आपल्या कुटुंबाबद्दल कार्यक्रमात बोलताना शमिता खूपच भा’वुक झाली होती. अशा वेळी तिला जे गिफ्ट मिळालं, ते बघून तिला भावना अनावर झाल्या. रक्षाबंधनाच्या निमित्ताने हिना खान या कार्यक्रमात सहभागी सर्व कलाकारांच्या घरच्यांकडून काही ना काही संदेश घेऊन आली होती. तिने सर्व स्पर्धकांच्या भावंडांची ओळख करून दिली. आपल्या घरच्यांना व्हिडिओ मेसेज मध्ये पाहून सहभागी स्पर्धक खूपच भावनावश झालेले पाहायला मिळाले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शमितालाही शिल्पा शेट्टीकडून खास व्हिडिओ मेसेज मिळाला. शिल्पाने या मेसेजमध्ये सांगितले, की “तू खूप हुशारीने खेळायला हवं. तू तुझी प्रभावी भूमिका सोडणं गरजेचं आहे. आई चांगली आहे आणि तिचं सर्व ठीक चालू आहे.” हे ऐकून शमिताला अश्रू आवरणं कठीण झालं.

तिला आपल्या बहिणीला बघून आणि तिचा मेसेज ऐकून आनंद झाला. पण त्याचबरोबर तिला आपल्या भावनांना आवरणं क’ठी’ण झालं. ती या मेसेज नंतर रडताना दिसून आली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shamita Shetty (@shamitashetty_official)

या एपिसोड मध्ये शमिताने सांगितले, की “माझा इंडस्ट्रीमध्ये खूप कठीण प्रवास झाला आहे. लोक मला आजही शिल्पाची बहीण म्हणून ओळखतात. माझी बहीण माझ्यासाठी संरक्षक सावलीसारखी आहे. मी भाग्यवान आहे, की आजही लोक मला माझ्या नावाने नाही, तर शिल्पाची बहीण म्हणून ओळखतात.”

You might also like