एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ट्रोलिंग ला कंटाळलेल्या शिल्पा शेट्टीने अखेर जारी केले स्टेटमेंट! सोशल मीडिया वर काय म्हणाली शिल्पा शेट्टी?

१९ जुलै २०२१ ला उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच ने अश्लील चित्रपट निर्मिती आणि हॉ’ट’शॉ’ट्स या ऍप वर त्याचे प्रसारण करणे या आरोपांखाली अटक केली. अनेक अभिनेत्रींनी पुढे येत राज कुंद्रा वर त्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आरोप केले. त्यानंतर त्यावर अनेक उलट सुलट चर्चा होऊ लागल्या. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी दोघांनाही सोशल मीडिया वर ट्रो’ल केलं जाऊ लागलं.

या सगळ्याला वैतागून शेवटी शिल्पा शेट्टीने सोशल मीडिया वर आपले स्टेटमेंट जारी केले आहे. तिने या स्टेटमेंट मध्ये म्हटले आहे, की “हो! गेल्या काही दिवसांपासून आम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. अनेक अ’फ’वा पसरत आहेत, अनेक आ’रो’प होत आहेत. अयोग्य प्रकारे आमच्या प्रतिष्ठेवर शिंतोडे उडवले जात आहेत. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर खूप ट्रो’लिं’ग केले जात आहे, अनेक प्रश्नचिन्हं उठवली जात आहेत.”

तिच्या या एकंदर प्रकरणातील भूमिकेबद्दल ती पुढे म्हणाली, “मी आजपर्यंत या घटनेवर एकदाही भाष्य केलेले नाही आणि यापुढेही करणार नाही. त्यामुळे माझ्या नावावर खोटे किस्से खपवणं बंद करा. एक सेलिब्रेटी म्हणून ‘तक्रार करू नका, स्पष्टीकरण देऊ नका’ हे माझे तत्त्वज्ञान राहिले आहे. या प्रकरणाची चौकशी अजून चालू आहे. मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे.”

आपल्या कुटुंबाला यातून त्रा’स होत असल्याचेही तिने या स्टेटमेंट मध्ये सांगितले आहे. “एक कुटुंब म्हणून आम्ही उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहोत. तोपर्यंत, विशेषतः एक आई म्हणून, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आमच्या मुलांसाठी तरी किमान आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा आणि एखाद्या गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही अर्धवट

माहिती पसरवू नका.”

 

“मी अभिमानाने कायद्याचे पालन करणारी भारतीय नागरिक आणि गेल्या २९ वर्षांपासून कार्यरत असलेली एक कष्टाळू प्रोफेशनल आहे. आजपर्यंत लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि मीदेखील या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाहीये.

त्यामुळे आमच्या अशा काळात माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या खासगी आयुष्याचा तुम्ही आदर करावा, अशी विनंती मी करते. आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही. कायद्याला आपले काम करू द्या. सत्यमेव जयते!” अशा शब्दांत तिने तिला आणि तिच्या कुटुंबियांना या परिस्थितीत एकटं सोडण्यासाठी विनंती केली आहे.

You might also like