एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

शिल्पा भेटली आपल्या ‘टुनकी’ ला! तब्बल ६ आठवडयांनी झाली भेट…

गेल्या काही महिन्यांपासून शिल्पा शेट्टीच्या मागे दुष्टचक्र लागल्यासारखे झाले आहे. जुलै मध्ये तिचे पती प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली. नेटकऱ्यांनी तिला यावरून प्रचंड ट्रो’ल केलं. त्यामुळे ती काही काळ सोशल मीडिया पासून लांब होती. ती ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या डान्स रिऍलिटी शो ची परीक्षक म्हणून काम पहात आहे. मात्र तिच्या पतीच्या अट’के’नंतर ती या शो मध्ये देखील गेली नव्हती.

दरम्यान तिच्या लाडक्या बहिणीला ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शो मध्ये जावे लागले होते. त्यामुळे शिल्पा खूप एकटी पडली होती. यावर्षीचा गणेशोत्सव पण तिने एकटीनेच साजरा केला. आता मात्र तिची बहीण शमिता शेट्टी बिग बॉस च्या घरातून परत आली आहे. तब्बल ६ आठवडयांनी ती आपल्या बहिणीला भेटली आहे. या दोघींचे फोटो शिल्पाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून शेअर केले आहेत. यामध्ये दोघी खूपच खूष दिसत आहेत.

शिल्पाने शेअर केलेल्या या फोटोंमधील एका फोटोमध्ये शिल्पा शमिताला कि’स करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने शमिताला घट्ट मिठी मारली आहे. या फोटोंना शिल्पाने छान कॅप्शन देखील टाकले आहे. ती म्हणते, “माझी टुनकी परत आली आहे… तू माझ्या या घट्ट मिठीतून सुटूच शकत नाहीस. घरी तुझे स्वागत आहे.” तिच्या या पोस्टला ८ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रेटींनीदेखील कमेंट्स केल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

शमिता ने बिग बॉस च्या घरात चांगली कामगिरी केली होती. ती टॉप ३ मध्ये पोचली होती. मात्र तिला या शो चे विजेतेपद जिंकता आलेले नाही. सहा आठवडे सुरू असलेल्या या शो ची विजेती ठरली दिव्या अगरवाल. शमिता तिच्या दिव्या आणि अक्षरा बरोबर या शो मध्ये झालेल्या वादामुळे चर्चेत आली होती. या शो मधील राकेश बापट बरोबरची तिची केमिस्ट्री देखील लोकांच्या चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरली होती.

दरम्यान तिची बहीण शिल्पाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर शमिताचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना शमिताला बिग बॉस जिंकून देण्याबद्दल आवाहन केले होते. शो सुरू असताना बऱ्याच वेळा शिल्पा आपल्या बहिणीला भरभरून पाठींबा देताना दिसली आहे. आता तिची बहीण परत घरी आल्याने तिला खूप आनंद झाला आहे.

You might also like