एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कोणत्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही राज आणि शिल्पाची लव्ह स्टोरी, पहिल्या पत्नीला सोडून केले शिल्पाशी लग्न!

सध्या राज कुंद्राच्या अट’केचं प्रकरण बरंच गाजतं आहे. त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तर या अट’केमुळे शूटींग देखील रद्द केले. तसे पाहायला गेले तर बॉलिवूड मध्ये शिल्पा आणि राज ची जोडी खूपच प्रसिद्ध आहे.

राज कुंद्रा उद्योगपती असला तरी शिल्पाशी लग्न झाल्यावर तो खूपच चर्चेत राहू लागला. दोघेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून वेळोवेळी आपले प्रेम व्यक्त करत असतात. पण या दोन वेगळ्या पेशातल्या व्यक्ती एकमेकांना भेटल्या कशा? काय आहे या दोघांची लव्ह स्टोरी? चला पाहूया.

२००७ मध्ये शिल्पाने ‘बिग ब्रदर’ हा रिऍलिटी शो जिंकला आणि तिला जगभर प्रसिद्धी मिळाली. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची भेट एका कॉमन मित्रामुळे झाली. दोघेही पहिल्यांदा लंडनमध्ये भेटले होते. शिल्पाने सांगितले की बघता क्षणी मी राजच्या स्माईल च्या प्रेमात पडले. दोघे एकमेकांना डे’ट करू लागले.

जवळपास दोन वर्षे दोघे एकमेकांना डे’ट करत होते. राज शिल्पाला अनेक महागड्या भेटवस्तू द्यायचा. शिल्पाचे त्यावेळी ‘लाईफ इन मेट्रो’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते.

दोन वर्षांनी राजने शिल्पाला पॅरीस मध्ये प्र’पोज केलं. ते पाहून शिल्पाला पहिल्यांदा धक्काच बसला. त्याने या स्पेशल क्षणासाठी संपूर्ण बँक्वेट हॉल बुक केला होता. डिनर झाल्यानंतर शिल्पाच्या पुढ्यात डेझर्ट आलं. त्या डेझर्टबरोबर आली ५ कॅरेटची हिऱ्याची अंगठी. राजने ती अंगठी घेऊन अगदी रो’मँ’टीक स्टाईलने गुढघ्यावर बसून शिल्पाला प्र’पोज केलं. २२ नोव्हेंबर २००९ रोजी दोघे लग्नबंधनात अडकले.

राज कुंद्राचे हे दुसरे लग्न आहे. त्याची पहिली पत्नी कविताने शिल्पावर आ’रोप केला की तिच्यामुळेच राजने कविता आणि त्यांच्या नवजात मुलीला सोडले. मात्र राजचं कविताबरोबरचं नातं राज आणि शिल्पाची भेट होण्यापूर्वीच संपलं होतं असा दावा करत शिल्पाने कवितांचे आ’रोप फेटाळून लावले.

शिल्पा आणि राज दोघेही एकमेकांच्या मतांचा आणि विचारांचा आदर करतात. त्यामुळेच इतक्या वर्षांनंतरही त्यांचे हे लग्न टिकून आहे.

या दोघांना विवान आणि शमिषा अशी दोन मुले आहेत. शिल्पाने १२ मे २०१२ रोजी खार येथील हिंदुजा हेल्थकेअर सर्जिकल हॉस्पिटलमध्ये आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. आरोग्याच्या कारणाने शिल्पा आणि राजने स’रो’ग’सी’चा निर्णय घेतला. त्यातून त्यांना मुलगी झाली. काय मग मंडळी, कशी तुम्हाला ही बॉलिवूड स्टाईल लव्ह स्टोरी? आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.

You might also like