एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

धक्कादायक! भारतीय क्रिकेटर शिखर धवन आणि पत्नी आयेशा मुखर्जीचा घट’स्फो’ट…कारण

नुकताच भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध कसोटी सामना दणक्यात जिंकल्याने क्रीडा रसिक भलतेच खूष आहेत. या विजयाचा जल्लोष देखील तितक्याच दणक्यात करण्यात आला. मात्र नुकतीच एक अशी बातमी हाती आली आहे, ज्यामुळे क्रिकेट रसिकांचे मन मोडण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेटर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जीचा घ’टस्फो’ट झाल्याच्या बातम्या येत आहेत.

आयेशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे या दोघांचा घ’टस्फो’ट झाल्याचे म्हणण्यात येत आहे. आयेशाचे हे दुसरे लग्न आहे. आधीच्या लग्नापासून आयेशाला २ मुली आहेत. २०१२ मध्ये आयेशा आणि शिखरचे लग्न झाले. त्यांना जोरावर नावाचा मुलगा आहे.

शिखर धवन कडून अजून याबद्दल कोणतेच वक्तव्य करण्यात आलेले नाही. नेटकऱ्यांनी मात्र आयेशाच्या या पोस्ट वर कमेंट करत तिला स्ट्रॉंग राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी तो तिचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे म्हणत तिच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आयेशाने यावर एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे.

“घट’स्फो’ट हा वाईट शब्द आहे असे मला वाटत होते, जोपर्यंत मला दोनदा त्या सगळ्यातून जावे लागले नाही. घट’स्फो’टिता असल्याने शब्दांत खूप ताकद असते हे लक्षात आले आहे. पहिल्यांदा जेव्हा मी घट’स्फो’ट घेतला तेव्हा मी खूप घाबरले होते. मला वाटले मी अपयशी ठरले आहे आणि काहीतरी चुकीचे करत आहे.

मला वाटले की मी सर्वांना निराश केले आहे आणि स्वार्थीपणाने वागत आहे. असे वाटले, की मी माझ्या पालकांना, मुलांना आणि अगदी देवालाही निराश केले आहे. घट’स्फो’ट हा इतका वाईट शब्द होता.” अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aesha Mukerji (@apwithaesha)

आयेशा पुढे लिहिते, “कल्पना करा, की आता मला दुसऱ्यांदा या सगळ्यातून जावे लागत आहे. हे खूप भयानक आहे. दुसऱ्यांदा घट’स्फो’ट घेताना माझ्याकडे गमावण्यासारखं खूप आहे, हे लक्षात येतंय. माझ्याकडे सिद्ध करण्यासारखं खूप आहे, हे लक्षात येतंय. त्यामुळे जेव्हा माझं दुसरं लग्न मोडलं, तेव्हा ते खूप भीतीदायक होतं. पहिल्या घट’स्फो’टाच्या वेळी जे झालं, जे जाणवलं, त्या विचारांनी पुन्हा मनात गर्दी केली. भीती, अपयश, निराशा १०० पटीने जास्त दाटून आली होती.”

शिखर धवन कडून अजून या बाबतीत कोणतेच अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. ते समजल्यानंतरच कळेल की हा सगळं नक्की काय प्रकार आहे तो.

You might also like