एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘रात्रीस खेळ चाले’ मधील शेवंताची बेस्ट फ्रेंड बरोबर मस्ती! व्हिडिओ झाला व्हायरल…

आपल्या मदमस्त अदांनी तमाम प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या शेवंताचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेतून शेवंता ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने. सध्या ती ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेतून पुन्हा शेवंताच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपल्या सौंदर्याने बघणाऱ्याला वेड लावणारी ही शेवंता अपूर्वाने खूप छान साकारली आहे. आण्णा आणि शेवंताची जोडी तर प्रेक्षकांची फेवरेट जोडी आहे.’

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

सध्या अपूर्वा आपली मैत्रीण दीक्षा सोनावणे बरोबर सुट्ट्या एन्जॉय करत आहे. याच सुट्ट्यांमधला तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. दीक्षा सोनावणेने ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत भैरवीची भूमिका निभावली आहे. तिची देखील ही भूमिका चांगलीच गाजली आहे. अपूर्वा आणि दीक्षा सध्या एकमेकींबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी केलेली मस्ती त्यांनी कॅमेऱ्यात कैद करत त्याचा व्हिडिओ बनवला आहे.

या दोघी नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करत असतात. या दोघींचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ देखील बरेच आहेत. दोघीही एकमेकींच्या पक्क्या मैत्रिणी आहेत. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओ मध्ये दोघीही एका बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत आहेत. अर्थात हा डान्स करतानाही दोघी खूप एन्जॉय करत आहेत.

‘जाने क्यूँ’ या गाण्यावर दोघी खूप मजा मस्ती करताना दिसत आहेत. दोघींनीही या व्हिडिओ मध्ये पांढरे बाथरोब घातले आहेत. किचन, बेडरूम आणि अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. प्रत्येक ठिकाणी दोघी खूप धमाल करताना दिसत आहेत. अपूर्वाने या व्हिडिओ ला एक छान कॅप्शन देखील दिली आहे. अपूर्वा या कॅप्शन मध्ये म्हणते, “तुझ्याबरोबर नवीन आठवणी निर्माण करणं ही माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

तर मित्रांनो, अपूर्वा तर आपल्या बेस्ट बडी बरोबर तिच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तुम्ही देखील तुमच्या मित्रमंडळींबरोबर सुट्ट्या एन्जॉय करतच असाल ना? तुमचे मित्रांबरोबर सुट्ट्या घालवण्याचे आवडते ठिकाण कोणते हे आम्हाला नक्की सांगा. तसेच अपूर्वा आणि दीक्षाचा हा सुट्टीचा प्लॅन तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आमचे आवडलेले लेख लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर देखील करा.

You might also like