एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बालक पालक’ मधील डॉली आठवते का? आता दिसते खूपच सुंदर…

२०१२ मध्ये रवी जाधव यांनी एक चित्रपट आणला जो बराच वेगळ्या विषयावर होता. हा चित्रपट आहे ‘बी पी’ अर्थात ‘बालक पालक’. लैं’गिक शिक्षणावर आधारीत या चित्रपटाने आपल्या नावावरून बरीच खळबळ माजवली होती.

पण हा चित्रपट पाहिला असता लक्षात येतं की तो विषय या चित्रपटामध्ये किती खुबीने मांडण्यात आला आहे. वाढत्या वयात मुलांना पडणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे मिळवण्याची धडपड या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

या चित्रपटात अनेक बालकलाकारांनी काम केले आहे. त्यांपैकी एक आहे ‘डॉली’ ची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री शाश्वती पिंपळकर. अभिनेत्री होणं हे काही तिचं पहिल्यापासूनचं स्वप्न नव्हतं, पण तिने लहान वयापासूनच रंगमंचावर काम करायला सुरुवात केली. सातवीत असताना तिने ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात काम केलं होतं.

शाश्वती मूळची पुण्याची असून तिचा जन्म १९९६ मध्ये झाला आहे. रोझरी हायस्कूल मधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून तिने IGNOU मधून बी. ए. (इंग्लिश लिटरेचर) ची पदवी घेतली. ती आठवीत असताना तिला ‘बंध रेशमाचे’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. मात्र या मालिकेत तिने चार महिनेच काम केलं. कारण त्यानंतर तिला तिचे आयुष्य बदलून टाकणारी ऑफर मिळाली. ती ऑफर होती चित्रपट ‘बालक पालक’ ची.

शाश्वती नववीत होती तेव्हा ‘बालक पालक’ चित्रीकरण सुरू झाले होते. हा चित्रपट तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. कारण या चित्रपटानंतरच तिने अभिनय क्षेत्रात आपले करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती छोट्या पडद्यावर ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ (२०१३) या मालिकेत दिसली. तिला पुढे ‘हेडलाईन’ (२०१४) आणि ‘मधू इथे अन् चंद्र तिथे’ (२०१६) सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याचीदेखील संधी मिळाली.

मालिका आणि चित्रपटांप्रमाणेच शाश्वतीला नाटयमंचावरही काम करण्याची संधी मिळाली. तिने ‘देहभान’ या नाटकात काम केले आहे. सध्या ती फक्त मराठी वाहिनीवरील ‘सिंधू’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती आपल्याला पारंपारिक वेशभूषेत दिसून येते.

खऱ्या आयुष्यात मात्र शाश्वती खूपच मॉडर्न आहे. तिचे सोशल मीडिया वरील फोटो पाहिले असता लक्षात येतं की छोटी ‘डॉली’ आता खूप मोठी झाली आहे आणि आता ती आधीपेक्षाही सुंदर दिसते. शाश्वती उत्कृष्ट नृत्यांगणा आहे. अभिनयात नसते तर डान्स मध्येच करिअर केले असते, असे ती म्हणते.

You might also like