एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मन उडु उडु झालं’ मालिकेतील शलाका आहे ‘या’ अभिनेत्रीची मुलगी! तिची आई सध्या असते गावी…

झी मराठी वाहिनी वर सुरू झालेल्या नव्या मालिकांमधील एक मालिका म्हणजे ‘मन उडु उडु झालं’. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. यातील प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे इंद्रा आणि दीपू तर प्रेक्षकांच्या लागलीच लाडक्या बनल्या आहेत. यांच्यात फुलणारी लव्हस्टोरी बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मालिकेत इंद्राची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊतने, तर दीपूची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळेने साकारली आहे. या दोघांबरोबरच मालिकेत अरुण नलावडे, रुपलक्ष्मी चौगुले, पूर्णिमा तळवलकर, रीना अगरवाल हे कलाकार देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

मालिकेत देशपांडे कुटुंबाला तीन मुली दाखवल्या आहेत. शलाका, सानिका आणि दीपिका अशी त्यांची नावे आहेत. यातील दीपिका साकारली आहे हृता दुर्गुळेने, तर सानिकाची भूमिका केली आहे रीना अगरवालने. देशपांडे कुटुंबाची मोठी मुलगी शलाकाची भूमिका निभावली आहे अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीने.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharvari Kulkarni (@sharvariikulkarnii)

सध्या याच शलाकाच्या लग्नाची धावपळ मालिकेत सुरू आहे. मालिकेत शलाका हे पात्र अत्यंत भित्रं घेतलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींना ती घाबरत असते आणि थोड्या थोडक्या कारणावरून तिच्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाहायला लागतात. शलाकाच्या सासरच्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करता करता देशपांडे कुटुंबाच्या नाकी नऊ येत आहेत. त्यातच त्यांच्या पिशवीतील पैसे कुणीतरी लंपास केल्याने सध्या देशपांडे कुटुंबाला पैशांची चणचण सोसावी लागत आहे.

शर्वरीने या आधी देखील मालिकांमध्ये काम केले आहे. तिने सोनी मराठी वाहिनी वरील ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तिने मीराची भूमिका साकारली होती. शर्वरी उत्तम डान्सर देखील आहे. तिने काही नाटकांमध्ये देखील काम केले आहे. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी तिने विभव बोरकर बरोबर लग्नगाठ बांधली. आपल्या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडिया वर शेअर केले होते. यात तिच्या आईला पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

sharvari-kulkarni-mother-sampada-joglekar-kulkarni

मित्रांनो, शर्वरी अभिनेत्री संपदा कुलकर्णीची मुलगी आहे. बसला ना आश्चर्याचा धक्का? संपदा कुलकर्णी हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेलं नाव आहे. संपदाने अनेक मालिका आणि नाटके देखील केली आहेत. ती विशेषकरून तिच्या सूत्रसंचालनासाठी खूप प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून संपदा आपले पती राहुल कुलकर्णी यांच्याबरोबर आपल्या कोकणातल्या घरी रहात आहे. तिथे ती शेतीबरोबर ‘आनंदाचं शेत’ हा ऍग्रो टुरिझम चा व्यवसाय देखील करत आहे.

You might also like