एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

हि प्रसिद्ध अभिनेत्री आहे ‘अशी ही बनवाबनवी’ मधल्या शंतनूची बायको, अक्षय कुमार सोबत देखील केले आहे काम..

मराठी चित्रपटसृष्टीत सुवर्णाक्षरांनी नाव कोरलेल्या काही चित्रपटांमध्ये ‘अशी ही बनवाबनवी’ हा एक चित्रपट. एक अखंड पिढी या चित्रपटाने हसवून हसवून लोटपोट केली. बॉक्स ऑफिस वर प्रचंड कमाई केलेला हा मराठी चित्रपट १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘बिवी और मकान’ या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता.

१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला आणि प्रत्येक सीनला लोकांनी डोक्यावर घेतले. हा चित्रपट पाहिलेली व्यक्ती आजही ते सीन आठवून खळखळून हसते. या चित्रपटातल्या चौकडीतला सगळ्यांत लहान म्हणजे शंतनू. या शंतनूची व्यक्तिरेखा साकारली होती सिद्धार्थ रे या अभिनेत्याने. त्याकाळी या चित्रपटातल्या इतर कलाकारांच्या तुलनेत सिद्धार्थचा अनुभव कमी असला तरी चित्रपटामध्ये त्याने ते कुठेही जाणवू दिले नाही.

सिद्धार्थचे खरे नाव आहे सुशांत रे. तो व्ही. शांताराम यांचा नातू होता. ‘चानी’ आणि ‘जैत रे जैत’ या मराठी चित्रपटांमध्ये सिद्धार्थने बालकलाकार म्हणून काम केले होते. मराठी सोबतच सिद्धार्थने वंश (१९९२), युद्धपथ (१९९२), परवाने (१९९३) आणि पहचान (१९९३) यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तसेच काही साऊथ इंडियन चित्रपटांमध्येही कामे केली आहेत.

१९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाजीगर’ चित्रपटातील व्यक्तिरेखेने सिद्धार्थला पुन्हा नव्याने ओळख मिळवून दिली, विशेषतः त्याच्यावर चित्रित झालेल्या ‘छुपाना भी नहीं आता…’ या गाण्याने. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘चरस’ हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. २००४ मध्ये सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने नि-धन झाले.

१९९९ मध्ये सिद्धार्थने साऊथ इंडियन अभिनेत्री शांतीप्रियाशी लग्न केले. त्यांना दोन मुलेही आहेत. शांतीप्रिया ही साऊथ इंडियन स्टार अभिनेत्री भानुप्रियाची लहान बहीण आहे. शांतीप्रियाने बऱ्याच तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

१९८७ मध्ये तिने ‘एंगा उरू पट्टुकरण’ या चित्रपटाद्वारे आपला तमिळ डेब्यू केला, तर तिच्या तेलगू फिल्म करिअरला ‘महर्षि’ (१९८८) या चित्रपटाने सुरुवात झाली. हिंदी चित्रपटसृष्टीत शांतीप्रियाची सुरुवात ‘सौगंध’ (१९९१) या चित्रपटाने झाली. यामध्ये ती अक्षयकुमारसोबत प्रमुख भूमिकेत दिसली होती.

‘विश्वामित्र’ (१९९५) या मालिकेद्वारे तिने आपला टीव्ही डेब्यू केला. ‘आर्यमान: ब्रह्माण्ड का योद्धा’ (२००२), ‘माता की चौकी: कलियुग में भक्ति की शक्ति’ (२००८) आणि ‘द्वारकाधीश: भगवान श्री कृष्णा’ (२०११) या मालिकांमध्येही शांतीप्रियाने भूमिका निभावल्या आहेत.

सिद्धार्थच्या जाण्यानंतर शांतीप्रिया एकटीच आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करते आहे.

You might also like