एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनाया अडकतेय लग्नबंधनात! ‘हा’ आहे तिचा होणारा नवरा..

झी मराठी वाहिनी वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका अत्यंत गाजली. यातील पात्रांनी आणि कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या मालिकेवर अनेक मीम्स बनवण्यात आले. मालिकेत सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेलं पात्र म्हणजे शनाया. नंतर नंतर तर एखाद्याचे विवाहबाह्य संबंध आहेत, असं म्हणण्याऐवजी लोक ‘त्याच्या पण आयुष्यात शनाया आहे’ असंच म्हणू लागले होते. इतकी ही मालिका लोकप्रिय झाली होती.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील हे शनायाचे गाजलेले पात्र साकारले होते अभिनेत्री रसिका सुनीलने. दिसायला सुंदर, मॉडर्न, काहीशी अल्लड, बऱ्याचदा बावळट वागणारी, पैशांच्या मागे धावणारी, पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकट म्हणून गॅरीच्या प्रेमात पडलेली अशी ही शनाया साकारत रसिकाने छोट्या पडद्यावर खूप धमाल उडवून दिली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

अलीकडेच तिने आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. ती तिचा बॉय’फ्रेंड आदित्य बिलागीसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडिया वरून तिने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. गेल्या वर्षांपासून रसिका आणि आदित्य एकमेकांना डे’ट करत आहेत. जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

‘जब वी मेट’ चित्रपटातील एक डायलॉग लिहीत आदित्यने रसिकाशी लग्न करणार असल्याची बातमी जाहीर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की “जेव्हा रसिकाने माझी आणि रश ची पहिल्यांदा भेट घालून दिली होती, तेव्हा तो म्हणाला होता, ‘माझ्या वयात एका नजरेत कळून जातं की मुला-मुलीत काय सुरू आहे.’ त्यामुळे रश ने जे भाकीत वर्तवलं, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा निर्णय घेतला आहे. रसिका, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपलं नातं अधिकृत करण्यासाठी मी अजून वाट पाहू शकत नाही.” 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditya Bilagi (@adi_bilagi)

रसिकाने ‘पोश्टर गर्ल’ (२०१६) चित्रपटात लावणीनृत्य करत मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवलं होतं. त्याच वर्षी तिला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनायाचे पात्र साकारायची संधी मिळाली. या भूमिकेसाठी तिला २०१६ आणि २०१७ अशा दोन्ही वर्षी झी मराठी चा ‘उत्कृष्ट नकारात्मक भूमिका’ चा पुरस्कारही मिळाला होता. अभिनेत्री असण्याबरोबरच रसिका एक उत्तम डान्सर आणि सिंगर देखील आहे. तिने बस स्टॉप (२०१७), गर्ल’फ्रेंड (२०१९) सारख्या मराठी चित्रपटांतही भूमिका निभावल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म ‘वाईल्ड गीज’ मध्येही तिने काम केलं आहे. रसिका आणि आदित्यला त्यांच्या सुखी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!

You might also like