एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पूरग्रस्तांना मदत करायच्या वेळी सोनू सूद नावाचा मसीहा कुठे गेला? शालिनी ठाकरेंचा सवाल…

महाराष्ट्रात यंदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकणासह महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे पाण्याखाली गेले. आधीच कोरोना काळातील परिस्थितीने जनतेचे कंबरडे मोडलेले असताना लोकांना पुराचाही सामना करावा लागला आहे. कोरोना काळात बऱ्याच लोकांच्या तोंडचा घास गेल्याने लोक अगतिक परिस्थितीत जगत आहेत. त्यात पुराने थैमान मांडल्यामुळे कसेबसे सांभाळलेले संसार पाण्यात वाहून गेल्याचे दृश्य आहे.

अशा वेळी लोकांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करणे अपेक्षित आहे. राज्यातल्या अनेक भागांमधून सामान्य नागरिकांनी आपल्या परीने जमेल तेवढी मदत पूरग्रस्त कुटुंबांसाठी पाठवली आहे.

अशा वेळी बॉलिवूड सेलिब्रेटी मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र पाहायला मिलत आहे. त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोणतेच पाऊल उचलले नाहीये. मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनी याच बाबतीत आवाज उठवला आहे.

बॉलिवूड कलाकार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आले नाहीयेत. हीच बाब लक्षात आणून देत मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनी बॉलिवूड कलाकारांवर टीका केली आहे.

“को’रोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान मसीहाचा जन्म झाला होता. मात्र कोकणात पूरपरिस्थिती असताना हे महात्मे गायब होतात. मुंबईत राहून, इथे पैसे कमवून यांची समाजसेवा केवळ राज्याबाहेरील लोकांपुरतीच का?” असा संतप्त सवाल त्यांनी आपल्या ट्विट मधून उपस्थित केला आहे.

शालिनी ठाकरेंनी महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबत बॉलिवूड सेलिब्रेटी असंवेदनशीलपणे वागत असल्याची टीका केली आहे. सोनू सूदच्या कामाचा यावेळी त्यांनी विशेष उल्लेख केला.

बाहेरील राज्यातील लोकांना मदत करणारे बॉलिवूड कलाकार महाराष्ट्राला मात्र कठीण काळात मदत करायच्या वेळी गायब होतात, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात एवढी कठीण पूरपरिस्थिती असताना हिंदी चित्रपटसृष्टीने कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचे त्या म्हणाल्या.

गेल्या वर्षी कोरो’नामुळे आपल्या घरी जाऊ न शकणाऱ्या परराज्यातील लोकांसाठी अभिनेता सोनू सूदने मदत केली होती. त्याच्या या कामाचे सर्व स्तरांतून खूप कौतुकही करण्यात आले होते.

लोकांनी ट्विट करून सोनू सूद कडे मदत मागितली होती आणि त्याने ती केलीही होती. त्याचा हा दानशूरपणा महाराष्ट्रातील पूरग्रस्तांबाबत मात्र जागा झाला नसल्याचे दिसते आहे.

कोरो’ना काळात अनेक बॉलिवूड कलाकार लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले होते. महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबत मात्र त्यांच्यात उदासीनता दिसून आली आहे. त्यांच्या या उदासीनतेवरच मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनी आपल्या ट्विट मधून निशाणा साधला आहे.

You might also like