एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘शाळा’ चित्रपटातील मुकुंद ला पाहून विश्वास बसणार नाही! आता झाला आहे मोठा अभिनेता..

२०११ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शाळा’ चित्रपट पाहून अनेक जणांना (आणि जणींना) आपले शाळेतले दिवस आठवले. चित्रपटाचा साधा सरळ विषय आणि त्यातल्या कलाकारांचा निरागस अभिनय अनेकांना आपल्या भूतकाळात घेऊन गेला. शाळेतले ते मोरपंखी दिवस आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जगायला लावणारे कलाकार होते केतकी माटेगावकर आणि अंशुमन जोशी.

‘शाळा’ ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसंच त्यातल्या कलाकारांचंही कौतुक झालं. पदार्पणातले अनेक पुरस्कार यातल्या कलाकारांनी मिळवले. यातलं आवर्जून लक्षात राहिलेलं काम म्हणजे मुकुंद या व्यक्तिरेखेचं. ही व्यक्तिरेखा अंशुमन जोशी या बालकलाकाराने साकारली होती. खरं तर ‘शाळा’ हा त्याचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट. पण तो पडद्यावर इतका सहज वावरला आहे की हा खरंच त्याचा पहिला चित्रपट आहे का याची शंका यावी.

तर असा हा ‘मुकुंद कुणी पाहिला’ आहे का सध्या? अंशुमन जोशी सध्या काय करतो, कुठे असतो असे प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. तर मंडळी, अंशुमन सध्या चित्रपटसृष्टीतच कार्यरत आहे. पण आता तो बराच मोठा झाला असून अजूनच हॅण्डसम देखील दिसतो. ‘शाळा’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अंशुमनला बालकलाकार म्हणून बरेच पुरस्कार मिळाले. चला तर जाणून घेऊया अंशुमन जोशीचा प्रवास.

अंशुमनने ‘शाळा’ नंतरही आपला अभिनयातला प्रवास सुरू ठेवला. म्हैस (२०१२), फोटोकॉपी (२०१६), फुंतरू (२०१६), फास्टर फेणे (२०१७) यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये अंशुमनने विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्याने ‘पुरणपोळी’ नावाच्या एका शॉर्ट फिल्म मध्येही काम केले आहे. २०१८ मध्ये त्याला इरफान खान आणि मिथिला पालकर यांच्याबरोबर ‘कारवा’ या हिंदी चित्रपटात काम करण्याचीही संधी मिळाली.

अंशुमन मूळचा कोल्हापूरचा आहे. सध्या तो पुण्यात राहायला आहे. त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. सध्या वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये भाग घेत तो आपली ही आवड जपतो आहे. अभिनयापलीकडे जाऊन अंशुमन स्वतःला वेगवेगळ्या भूमिकांमधून घडवतो आहे.

जरी तो बालकलाकार म्हणून प्रसिद्धीस आला असला तरी तो एक उत्तम लेखक, चिंतनकार आणि चित्रलेखक आहे. त्याला फोटोग्राफीचीही आवड आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला भेट दिली तर तुम्हाला दिसेल की त्याने अनेक सुंदर क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

अशा या गुणी कलाकाराच्या पुढच्या कलाकृतीची प्रेक्षक आवर्जून वाट पहात आहेत. लवकरच आपण त्याला नवीन चित्रपटात बघू शकू अशी आशा करूयात. या बहुगुणी अभिनेत्याला आमच्या टीम कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

You might also like