एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कुटुंबाचा विरोध पत्करून शक्ती कपूरशी ‘या’ अभिनेत्रीने केले लग्न! नक्की कोण आहे ही अभिनेत्री?

१९९४ ला प्रदर्शित झालेल्या ‘राजा बाबू’ या चित्रपटाने जेवढी प्रसिद्धी गोविंदाला मिळवून दिली, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली त्यातल्या एका सहाय्यक अभिनेत्याला. तो अभिनेता आहे शक्ती कपूर.

“नंदू सबका बंधू” म्हणत शक्ती कपूरने या चित्रपटातून प्रेक्षकांची खूप हसवणूक केली होती. ८० आणि ९० च्या दशकांत खलनायक किंवा विनोदी अभिनेता म्हणून शक्ती कपूर यांनी बरंच नाव कमावलं.

शक्ती कपूर यांचा जन्म १९५२ मध्ये दिल्ली येथे झाला. ते पंजाबी कुटुंबातील आहे. सुनील दत्त यांनी शक्ती कपूर यांचे ‘सुनील सिकंदरलाल कपूर’ हे नाव बदलून एखाद्या खलनायकाला शोभेल असे ‘शक्ती कपूर’ हे नाव बहाल केले.

१९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खेल खिलाडी का’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. शक्ती कपूर यांनी आजपर्यंत जवळपास २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०११ मध्ये ते ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शो मध्ये देखील सहभागी झाले होते.

१९८२ मध्ये शक्ती कपूर यांनी अभिनेत्री शिवांगी कोल्हापुरे यांच्याशी लग्न केलं. त्यांचा प्रेमविवाह आहे. शिवांगी कोल्हापुरे अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांची बहीण आहे. त्यांच्या वडीलांचे नाव पंडीत पंढरीनाथ कोल्हापुरे असून आईचे नाव अनुपमा कोल्हापुरे आहे. शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

नशीब त्यांना अभिनयाकडे घेऊन गेले. १९८० ला प्रदर्शित झालेल्या ‘किस्मत’ या चित्रपटाद्वारे अश्विनी कोल्हापुरेंनी आपली चित्रपट कारकीर्द सुरू केली. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि रंजिता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात शक्ती कपूर देखील होते. या चित्रपटाच्या सेटवरच शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची भेट झाली. १९६४ ला जन्माला आलेल्या शिवांगी त्यावेळी जवळपास १७ वर्षांच्या होत्या. दोघांची भेट झाली आणि दोघे प्रेमात पडले.

या दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. मात्र शिवांगीच्या घरून या लग्नाला विरोध होता. घरच्यांचा विरोध झुगारून या दोघांनी लग्न केले. लग्नानंतर शिवांगी चित्रपटांपासून दूर गेल्या. आपल्या संसाराकडे आणि परिवाराकडे लक्ष देणे या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिले. शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव सिद्धांत कोल्हापुरे असून मुलगी श्रद्धा कपूर हीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

You might also like