एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सेम टू सेम! जुळे असल्यासारखे दिसतात हे बॉलिवूड मधील कलाकार…

बॉलिवूडमध्ये भावंडांच्या अनेक जोड्या आहेत हे तर सर्वज्ञातच आहे. आज पाहूया अशा काही जोड्या ज्या हुबेहूब एकमेकांसारख्या दिसतात.

१. कतरीना कैफ – इसाबेल कैफ
कतरीना कैफ आपल्या सौंदर्यामुळे आणि नृत्यामुळे बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध आहे. तिच्या बहिणीने म्हणजेच इसाबेलने देखील बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. वयात अंतर असून देखील इसाबेल हुबेहूब आपल्या बहिणीसारखीच दिसते.

२. शिल्पा शेट्टी – शमिता शेट्टी
आपल्या फिटनेस साठी प्रसिद्ध असलेल्या शिल्पाला शमिता नावाची लहान बहीण आहे. ‘मोहोब्बतें’ या चित्रपटातून शमिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र शिल्पासारखं यश तिच्या वाट्याला आलं नाही. या दोघींचे एकत्र फोटो पाहिल्यास दोघी अगदी जुळ्या बहिणी वाटतात.

३. भूमी पेडणेकर – समीक्षा पेडणेकर
भूमी पेडणेकर बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्रींनपैकी एक. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या कलाकारांमध्ये भूमीचं नाव घेता येईल. तिची बहीण समीक्षा पेडणेकर ही पेशाने वकील आहे. दोघी जुळ्या बहिणी आहेत. मात्र दोघींमधला फरक नवीन माणसाला ओळखता येणे कठीण आहे.

४. शक्ती मोहन – मुक्ती मोहन
शक्ती मोहन आणि मुक्ती मोहन या दोघी बहिणी डान्सर आहेत. दोघींमध्ये वयाचं अंतर असलं तरी जेव्हा या एकत्र डान्स करतात, तेव्हा त्यातली शक्ती कोण आणि मुक्ती कोण हे ओळखणं कठीण होऊन जातं इतकं या दोघींमध्ये साम्य आहे.

५. भारती सिंग – पिंकी सिंग
हिंदी इंडस्ट्री मध्ये विनोदाच्या वर्तुळात भारती हे नाव ऐकलं नाही, असा माणूसच सापडणार नाही. भारतीची मोठी बहीण पिंकी चित्रपटसृष्टीत काम करत नाही. मात्र या दोघी अगदी एकसारख्या दिसतात.

६. अनिल कपूर – संजय कपूर
बॉलिवूडचा एव्हरग्रीन झकास अभिनेता अनिल आणि संजय दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. दोघांनी बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. अनिलसारखे यश मात्र संजयला मिळवता आलेले नाही.

७. अनुपम खेर – राजू खेर
बॉलिवूड मधल्या तगड्या कलाकारांपैकी एक म्हणजे अनुपम खेर. अनेक चित्रपटांमधून त्यांनी दमदार भूमिका निभावल्या आहेत. त्यांचा भाऊ राजू खेर अगदी अनुपम यांच्यासारखाच दिसतो.

८. मलायका अरोरा – अमृता अरोरा
मलायका आणि अमृता एकमेकींच्या खूप जवळ आहेत. मलायका सारखे यश जरी अमृताला मिळाले नसले तरी त्यामुळे या दोघींच्या नात्यावर याचा काहीच परिणाम झाला नाहीये.

You might also like