एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मधील हे शिखरे हवालदार नक्की आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल..

रबरासारखी ताणत नेलेली ‘देवमाणूस’ ही मालिका कधी संपणार, कधी संपणार असा घोष चालला असताना अचानक आता ही मालिका संपणार असल्याची घोषणा झाली. १५ ऑगस्ट ला या मालिकेचा शेवटचा भाग दाखवण्यात येणार आहे.

रात्री साडेदहाच्या स्लॉट मध्ये टीआरपी मध्ये अव्वल असलेली ही मालिका अलीकडे काहीशी भरकटल्यासारखी वाटायला लागली होती. मात्र चंदा या पात्राची एन्ट्री झाल्यावर प्रेक्षक काहीसे परतून यायला लागले.

चंदा सारख्याच या मालिकेत अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत ज्या काही काळापुरत्याच मालिकेत दिसल्या होत्या. त्यापैकी एसीपी दिव्या सिंग, सरकारी वकील आर्या देशमुख, एसीपी रणजित चव्हाण या काही व्यक्तिरेखा आहेत. जरी या व्यक्तिरेखांच्या भूमिकांची लांबी फारशी नसली तरी या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली आहे. या कलाकारांना देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.

यातलेच एक कलाकार आहेत सत्यवान शिखरे. ‘देवमाणूस’ मालिकेत सत्यवान शिखरे यांनी ‘हवालदार विराज शिखरे’ ही भूमिका साकारली आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या व्यक्तिरेखांमधली हवालदार शिखरे ही एक व्यक्तिरेखा. एसीपी दिव्या सिंग च्या हाताखाली असलेले हवालदार शिखरे हे राकट दाखवले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Satyawan Shikhare (@satyawanshikhare)

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सत्यवान शिखरे ‘स्वराज मार्केटिंग’ मध्ये काम करत होते. कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटी मधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

मालिकेत एसीपी दिव्या सिंगच्या हाताखाली हवालदार विराज शिखरे तडफेने काम करताना दिसतात. जशी ऑनस्क्रीन ही तडफदार जोडी लोकांनी पसंत केली होती, तशीच ही जोडी ऑफस्क्रीनसुद्धा खूप प्रसिद्ध झाली होती.

दिव्या सिंग ची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री नेहा खान आणि सत्यवान शिखरे सोशल मीडिया वर खूप सक्रीय असतात. मध्यंतरी या दोघांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गाण्यावर डान्स केलेला व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.

“पोलिसवाल्या साईकलवाल्या बिरेक लावून थांब, टोपी तुझी रं हातात माझ्या होईल कसं रं काम, जाऊया डबल शिट रं लांब लांब लांब” हे ते गाणं. शिखरे यांची मालिकेतील हवालदाराची भूमिका आणि हे हवालदाराचं गाणं यांचा मेळ अगदी उत्तम जमून आला होता. यातील शिखरेंच्या डान्स ला लोकांनी भरभरून दाद दिली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Satyawan Shikhare (@satyawanshikhare)

‘देवमाणूस’ मालिका आता शेवटच्या टप्प्यावर आहे. यातल्या व्यक्तिरेखांना लोक खूप मिस करणार आहेत हे तर नक्की. मंडळी, तुम्ही पण तुमच्या आवडीच्या कलाकाराला मिस कराल ना? ‘देवमाणूस’ मालिकेतला तुमचा आवडता कलाकार कोण हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

You might also like