एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सरू आजी रॉक्स! ‘देवमाणूस’ मधील सरू आजीचा खऱ्या आयुष्यातील लूक व्हायरल…

‘देवमाणूस’ मालिकेतल्या सरू आजी म्हणजे भन्नाट म्हणींचं दुकान. त्यांची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतली आहे. सरू आजींची ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री रुक्मिणी सुतार यांनी.

गेली दहा वर्षे रुक्मिणी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. ७० वर्षांच्या रुक्मिणी यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. मिसेस मुख्यमंत्री, लागीरं झालं जी, दुर्वा यांसारख्या मालिका त्यांनी केल्या आहेत. तसेच जाऊ द्या ना बाळासाहेब, बघतोस काय मुजरा कर, होम स्वीट होम, पोशिंदा, पहिली शेर दुसरी सव्वाशेर यांसारख्या मराठी आणि ‘दबंग’ सारख्या हिंदी चित्रपटांमधून देखील त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.

‘देवमाणूस’ मालिकेतल्या ‘सरू आजी’ या भूमिकेने रुक्मिणी सुतार यांना खरी ओळख मिळवून दिली. काळा चष्मा, नऊवारी साडी आणि तोंडात एकापेक्षा एक म्हणींचं भांडार असा साधारण सरू आजींचा या मालिकेतला अवतार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by देवमाणूस (@devmanus_official)

खऱ्या आयुष्यात मात्र या सरू आजी एकदम रॉकींग दिसतात बरं का! नुकताच त्यांची ‘देवमाणूस’ मधली सहकलाकार म्हणजे वंदी आत्या साकारणारी अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी रुक्मिणी सुतार यांच्याबरोबरचा एक फोटो सोशल मीडिया वर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रुक्मिणी अगदी तरुण आणि मॉडर्न दिसत आहेत. त्यांचा हा लूक सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोमध्ये रुक्मिणी सुतार अगदी ग्लॅमरस दिसत आहेत. त्यांचा हा लूक प्रेक्षकांना अगदी आवडून गेला आहे. खऱ्या आयुष्यात रुक्मिणी खूपच मनमौजी आहेत. वयाच्या सत्तरीतही त्यांचा उत्साह अगदी तरुणांना लाजवेल असा आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by K I R A N G A I K W A D (@kiran_gaikwad12)

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी रुक्मिणी नोकरी करत होत्या. मात्र त्यांची अभिनयाची आवड त्यांना गप्प बसू देत नव्हती. आपली नोकरी सांभाळत त्या सुट्टीच्या दिवशी कुटुंबियांपासून लपतछपत नाटकांमध्ये भाग घेत असत. रुक्मिणी यांना आयुष्यात एकदा तरी महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे.

आपल्या आवडत्या व्यक्तिरेखांचे खऱ्या आयुष्यातले फोटो प्रेक्षकांना एक वेगळाच उत्साह देऊन जातात. सरू आजींचे देखील बरेच चाहते आहेत. त्यांचा हा लूक बघून चाहत्यांनी त्यांना भरभरून दाद दिली आहे. काय मग मंडळी, तुम्हाला कसा वाटला सरू आजींचा हा फ्रेश लूक? तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आमचे लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like