एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

नक्की काय सुरू आहे- ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ की ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’? ओव्हर ऍक्टिंगमुळे परीक्षक ट्रो’ल..

 मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ ची उत्सुकता सर्वांनाच होती. ही उत्सुकता ताणली गेली ती या कार्यक्रमाच्या परीक्षकांमुळे. हे पाच परीक्षक दुसरे तिसरे कुणी नसून ते आहेत बारा वर्षांपूर्वी झालेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या पर्वाचे अंतिम स्पर्धक. पंचरत्नं म्हणून आख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेले हे पाच लिटिल चॅम्प्स आता परीक्षक बनून नव्या लिटिल चॅम्प्सना मार्गदर्शन करतील.

२००९ मध्ये झी मराठीवर ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ हा अजून एक कार्यक्रम बराच गाजला. मराठी मुलांमधील ऍक्टिंग टॅलेंट शोधून काढण्यासाठी हा शो होता. आताचे ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ पाहिल्यावर ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ ची आठवण आल्याशिवाय रहात नाही. त्याला कारणही तसेच घडले आहे. सध्या सोशल मीडिया वर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ चे परीक्षक आणि अँकर त्यांच्या ओव्हर ऍक्टिंग मुळे प्रचंड ट्रो;ल होताना दिसत आहेत.

या शो चे तीन भाग प्रसारित झाले आणि प्रेक्षकांनी अँकर मृण्मयी देशपांडेसह परीक्षक कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, रोहित राऊत आणि मुग्धा वैशंपायन यांची ओव्हर ऍक्टिंग वरून खिल्ली उडवायला सुरुवात केली.

ओव्हर ऍक्टिंग बरोबरच हे पाचही परीक्षक ‘सारेगमप’ च्या पूर्व-परीक्षकांना कॉपी करत असल्याचे बऱ्याच नेटिझन्सचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे अँकर मृण्मयी ला बघताना अनेकांनी ‘पल्लवी जोशीच बरी होती’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकारांतून सध्या सोशल मीडिया मध्ये मिम्स चे जबरदस्त वारे वाहात असून परीक्षक आणि अँकर ला ट्रो’ल केले जात आहे.

एका मिम मध्ये पाच परीक्षक आणि अँकर यांची ऑफिसमधल्या वेगवेगळ्या नमुन्यांशी बरोबरी केली आहे. खूप जणांनी आपण केवळ ‘ती सध्या…’ फेम आर्या आंबेकर साठी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ बघत असल्याची गमतीदार कबुली दिली आहे. मृण्मयीची अँकरिंग करण्याची स्टाईल बऱ्याच जणांना खटकली असून त्यावरूनही तिला ट्रो’ल केलं जातंय.

रोहित ची प्रत्येक गाण्यानंतरची (कधी कधी न समजणारी) कमेंट हादेखील चेष्टेचा विषय झाला आहे, तर कार्तिकीला लोक ‘मराठीतली नेहा कक्कर’ म्हणून ओळखू लागले आहेत. परीक्षकांनी स्पर्धकांना दिलेली टोपणनावंदेखील या ट्रो’लच्या साथीतून सुटली नाहीयेत.

कारण काही का असेना, प्रेक्षक झी मराठी वरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ (वेगवेगळ्या कारणांसाठी) मनापासून एन्जॉय करत आहेत हेच खरं! प्रेक्षकांचे मनोरंजन हेच कार्यक्रमाचे यश. आणि आमच्या वाचकांचे मनोरंजन हीच आमच्या कामाची पोचपावती.

तर मित्रहो, आमच्या या कामाची पोचपावती कमेंट्स मध्ये द्यायला विसरू नका.

You might also like