एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘शांताबाई..’ गाण्याच्या तालावर सर्वाना नाचवणाऱ्या या कलाकारावरती आली आहे उपासमारीची वेळ! घरात मुले उपाशी आहेत. खिशात रुपया पण नाही..

‘शांताबाई…’ हे गाणं लागलं आणि त्यावर थिरकला नाही असा एकही माणूस नाही. आख्ख्या महाराष्ट्राच्या तरुणाईला ज्या गाण्याने वेड लावलं ते गाणं म्हणजे ‘शांताबाई’. लग्नसमारंभ असो वा वाढदिवस, बारसं असो वा गणेश विसर्जन, डीजे वर हे गाणं हमखास वाजणारच. लांबून ऐकू आलं तरी पाय थिरकायला लागतात या गाण्याच्या चालीवर. तर अशा या गाण्यानं एकेकाळी महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला होता. या गाण्याच्या निर्मात्यावर मात्र आज अत्यंत कठीण प्रसंग ओढवला आहे.

को’रो’नाच्या संकटाने एकतर लोक देवाघरी तरी गेले, नाहीतर रस्त्यावर तरी आले. या महा’मारीच्या कचाट्यातून कोणीच सुटू शकलं नाहीये. गेल्या दीड वर्षात अनेक लोकांच्या हातचं काम गेल्याने बऱ्याच जणांवर उपा’समारीची वेळ आली आहे. या दुर्दैवाच्या फेऱ्यातून ‘शांताबाई’ चे कर्ते-करविते संजय लोंढे यांची देखील सुटका झाली नाही. साठवलेला पैसाही संपल्याने आता लोककलावंत आणि त्यांच्या कुटुंबांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

‘शांताबाई’ गाणं प्रसिद्ध झालं आणि संजय लोंढे यांना अनेक रेकॉर्डींगची कामं मिळू लागली. त्यामुळे त्यांचे दिवस पालटले. पण लॉक’डा’ऊन सुरू झाला आणि हे सगळंच बंद झालं. “मला काहीतरी मदत करा. खूप अ’ड’चणीत आहे. माझा सख्खा मोठा भाऊ वा’रला आहे. घरात मुले उपाशी आहेत. खिशात एक रुपया पण नाही. घरातील सिलेंडर संपलाय. माझे शो बंद आहेत, रेकॉर्डींग बंद आहे. काय करावं सुचेना.” लोककलावंतांच्या परिस्थितीची जाणीव करून देणारा हा संजय लोंढे यांचा मेसेज.

“एकही स्टुडीओ सुरू नाहीये. रेकॉर्डींग पूर्ण बंद आहे. मध्यंतरी एखादं काम मिळालं तरी पोलीस रेकॉर्डींग बंद करायचे. त्यामुळे उत्पन्न थांबले.” संजय लोंढे सांगत होते. आधीच काम नसल्याने उत्पन्न थांबलं होतं. त्यात अनेक सं’कटे आली. संजय लोंढे यांच्या मोठ्या भावाला को’रो’ना झाल्याने ससून रुग्णालयात भरती केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृ’त्यू झाला.

“भावाचे अंत्यसंस्कार करायला पण माझ्याकडे पैसे नव्हते. शेवटी रुग्णालयाच्या मदतीने अंत्यसंस्कार केले. पण नंतर दिवसकार्य काहीच करता आले नाहीत.” लोंढे सांगत होते. त्यांच्या घरातला सिलेंडरदेखील संपल्याने आता सात जणांच्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

मध्यंतरी संजय लोंढे यांनी लोककलावंतांची परिस्थिती सांगणारं एक गाणंही तयार केलं होतं. पण परिस्थितीपुढे हात टेकण्यापलीकडे अशा कलावंतांच्या हातात काहीच राहिलं नाहीये. त्यांना फक्त आता लोकांकडून मदतीची आशा आहे.

You might also like